कोरोना संकटात पण शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला

कोरोना संकटात पण शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबर फटका बसत असला तरी मागील आठवड्यापासून शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२० अंकांनी वधारला आहे. तो ४९५२७ अंकावर आहे. तर निफ्टी ९६ अंकांनी वधारला असून तो १४९२० अंकांवर आहे. आज बाजाराला धातू आणि फार्मा क्षेत्राकडून चांगला पाठिंबा मिळत आहे. धातू निर्देशांकात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर फार्मा इंडेक्समध्ये १.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बँका आणि वित्तीय निर्देशांकही ग्रीन मार्कमध्ये व्यापार करीत आहेत. आज डॉ. रेड्डीज आणि ओएनजीसी अव्वल लाभार्थी आहेत, तर इन्फोसिसला आज नुकसान सहव करावं लागलं आहे.

हे आहेत टॉप गेयर्स, टॉप लूजर्स

आजच्या व्यवसायात, लार्जकॅप समभागात चांगली खरेदी दिसून येत आहे. सेन्सेक्सचे ३० पैकी २६ समभाग तेजीत आहेत, तर ४ लाल चिन्हात आहेत. डॉ. रेड्डीज, एचडीएफसी, सन फार्मा, ओएनजीसी, एलटी, एम अँड एम, एअरटेल आणि इंडसइंड बँक या कंपन्यांचा समावेश आहे. टॉप लूजर्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि नेस्ले इंडियाचा समावेश आहे.

 

First Published on: May 10, 2021 3:07 PM
Exit mobile version