दिल्लीत नव्या मोटर वाहन कायद्याविरोधात बंद

दिल्लीत नव्या मोटर वाहन कायद्याविरोधात बंद

केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीमध्ये 51 वाहतूक संघटनांनी बंद पुकारला आहे. यामुळे प्रशासनाला शाळांना सुटी जाहीर करावी लागली आहे. 1 सप्टेंबरपासून नवा कायदा लागू झाल्यानंतर दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये आकारलेला दंड 6 लाखांवर गेला होता. यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी पसरली आहे. याशिवाय विमा रक्कम, आरएफआयडी टॅगची सक्ती यासह अन्य मुद्दे आहेत.

यामुळे दिल्लीतील वाहतुकीवर परिणाम होणार असून 25 हजार ट्रक, 35 हजार रिक्षा, 50 हजाराच्या आसपास टॅक्सी आणि कॅब सोबत स्कूलबस-व्हॅनही बंद राहणार आहेत. यामुळे लोकांना येण्याजाण्यास समस्या निर्माण होणार आहेत. युनायटेड फ्रंट ऑफ ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे महासचिव शामलाल गोला यांनी सांगितले की, बंदमध्ये दिल्लीसोबत एनसीआरचे वाहनही सहभागी होणार आहेत. जर सरकारने मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर दोन दिवसांत बैठक घेऊन हा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणार आहोत.

यामुळे वाहतूक संघटनांनी बुधवारी रात्रीपासून 24 तासांचा सांकेतिक बंद पुकारला आहे. यामुळे शाळांनाही सुटी देण्यात आली आहे. दिल्लीच्या सीमेवर उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील एका शाळेने पालकांना मॅसेज करून शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविले आहे. यानंतर सर्वच शाळांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

First Published on: September 20, 2019 1:19 AM
Exit mobile version