विकास दर घटला तरी निराश होण्याचे कारण नाही

विकास दर घटला तरी निराश होण्याचे कारण नाही

देशाचा विकास दर घटून तो आता पाच टक्क्यांवर आला आहे; पण तरीही निराश होण्याचे कारण नाही. सरकार त्यावर व्यापक उपाययोजना करीत आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. त्या म्हणाल्या की, युपीए सरकारच्या काळातही एकदा हा दर पाच टक्क्यांवर आला होता.

कर विभागाचे अधिकारी आणि उद्योजकांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केल्यानंतर त्या बातमीदारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, हा विकास दर खाली आला असला तरी तो या दशकातील नीचांकी दर नाही. तथापी आम्ही विविध क्षेत्रातील गरजांकडे दुर्लक्ष केलेले नाही. त्यांचे महत्त्व आम्ही जाणतो आणि त्या अनुषंगाने आम्ही उपाययोजनाही करू. अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत प्रथम नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले आहे. अन्यथा देशाचा विकास दर कमी झाल्याच्या घटनेला फार महत्त्व देण्याचे त्यांनी टाळले होते. उलट आजही आपला विकास दर अमेरिका आणि जागतिक विकास दरापेक्षा जास्तच असल्याचे विधान त्यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानांना महत्त्व दिले जात आहे.

विविध क्षेत्रांपुढे आज जी आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे त्याची सरकारला कल्पना आहे, असेही त्या म्हणाल्या. या क्षेत्रांच्या समस्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. सरकारकडे निधी नाही म्हणून सामाजिक क्षेत्रासाठी अंदाजपत्रकात त्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. त्या खर्चाला कात्री लावली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

First Published on: September 9, 2019 2:01 AM
Exit mobile version