तीन राज्यांत जातात रोज ३.२० कोटी

तीन राज्यांत जातात रोज ३.२० कोटी

महादेव जानकर यांचा आरोप

महाराष्ट्रात अंडी, चिकन व मासे यासह दुधाच्या उत्पादन वाढीची मोठ्या प्रमाणात गरज अनेकदा व्यक्त होते. मात्र, त्यावर पुढे काहीच उपाययोजना होत नसल्याने शेजारच्या तीन राज्यांना राज्यातून रोज ३.२० कोटी रुपये जात असल्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मान्य केले आहे.

कोल्हापूरमधील कार्यक्रमात ते म्हणाले की, येथील अंडी उबवणी केंद्र हे राज्यात आघाडीवर आले आहे. त्याबद्दल सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांचे विशेष अभिनंदन. लवकरच येथील रिक्त पदे भरली जातील. दररोज 1 कोटी 40 लाख रूपयांची अंडी तितकेच दूध आणि मत्स्यबीज लागते. हे सर्व गुजरात, तेलंगणा, कर्नाटकमधून येते. त्यासाठी राज्याचे दररोज 3 कोटी 20 लाख रूपये खर्ची पडतात. राज्याचे हे पैसे वाचवण्यासाठी महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनवा. त्यासाठी शेतकर्‍यांच्या बांधावर जा शेतकर्‍यांना तयार करा आणि राज्याचे उत्पन्न वाढवा.

First Published on: July 22, 2019 4:14 AM
Exit mobile version