UAN-Aadhaar ला लिंक करण्यासाठी EPFO ने अंतिम मुदत वाढवली; ‘ही’ आहे नवी डेडलाईन

UAN-Aadhaar ला लिंक करण्यासाठी EPFO ने अंतिम मुदत वाढवली; ‘ही’ आहे नवी डेडलाईन

EPFO ने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या आधार क्रमांकाच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ची पडताळणी करून भविष्य निर्वाह निधी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढविली आहे. यापूर्वी ईपीएफओने 1 जून 2021 ची अंतिम मुदत निश्चित केली होती, मात्र आता त्यात वाढ करून 1 सप्टेंबर 2021 पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचा आधार क्रमांक त्यांच्या पीएफ खातं आणि यूएएन क्रमांकाशी जोडण्यासाठी अधिक वेळ कंपनीला मिळणार आहे.

EPFO ने जारी केलेल्या आदेशानुसार इलेक्ट्रॉनिक चालान म्हणजेच यूएएन सह पीएफ रिटर्न (ईसीआर) प्राप्त करण्याची अंतिम मुदत 1 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाने अधिसूचना दिल्यानंतर EPFO ने आधार क्रमांक जोडणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. कामगार मंत्रालयाने 3 मे रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी करून मंत्रालय व त्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्थांना लाभार्थ्यांकडून आधार क्रमांक घेण्यास सांगितले. सामाजिक सुरक्षा संहितेच्या कलम 142 मध्ये लाभ आणि सेवा मिळविण्यासाठी आधार नंबरद्वारे कर्मचारी किंवा असंघटित कामगार किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची ओळख स्थापित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

UAN म्हणजे नेमकं काय?

UAN म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा मुळात कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी संस्थेने ईपीएफ जमा केलेल्या प्रत्येक कर्मचार्‍यास देण्यात आलेला 12-अंकी खाते क्रमांक असतो. यूएएन खाते धारकांसाठी पीएफ खाते सेवा आणि त्याचे इतर व्यवहार जसे की, पैसे काढणे, पीएफ कर्ज किंवा ईपीएफ शिल्लक तपासणीसाठी आवश्यक प्रक्रिया सुलभ आणि सोयीस्कर करतो.

असे करा आधार कार्ड अपडेट ?

कर्मचाऱ्यांचे आधार कार्ड PF खात्याशी जोडण्याची जबाबदारी त्यासंबंधीत कंपनीची असते. EPFO ने देखील यासंदर्भातील अधिसुचना जाहीर केली आहे. त्यामुळे आधार लिंक न झा्ल्यास कर्मचाऱ्य़ांच्या पीएफ खात्यात ती रक्कम दाखवली जाईल जी त्यांच्या पगार आणि महागाई भत्त्यातून येते.

सोप्या स्टेप फॉलो करून आधार लिंक करा

 

 

First Published on: June 16, 2021 3:16 PM
Exit mobile version