Gautam Adani : कोण आहेत गौतम अदानी यांची पत्नी? लग्नापूर्वी करत होत्या हे काम…

Gautam Adani : कोण आहेत गौतम अदानी यांची पत्नी? लग्नापूर्वी करत होत्या हे काम…

जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचे वैयक्तिक आयुष्य फारच कमी चर्चेत राहिले आहे.

जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचे वैयक्तिक आयुष्य फारच कमी चर्चेत राहिले आहे. अदानी आपल्या पत्नीला आपल्या जीवनाचा आधारस्तंभ म्हणतात. अदानी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, प्रीती अदानी यांनी आपल्या प्रगतीसाठी आपले करिअर पणाला लावले. त्यांनी आपल्या लग्नाबद्दलही किस्से सांगितले आहेत. जेव्हा ते प्रीतीला लग्नासाठी पहिल्यांदा भेटले तेव्हा ते खूप शांत होते.

गौतम अदानी आणि प्रीती यांनी अरेंज मॅरेज केलं होतं. पहिल्या भेटीबाबत अदानी यांनी सांगितलं होतं की, ते खूप लाजाळू होते. अदानी म्हणतात, “मी एक अशिक्षित माणूस होतो आणि त्या डॉक्टर…त्यामुळे नैसर्गिकरित्या ही जोडी थोडीशी जुळत नव्हती. १ मे १९८६ रोजी प्रीती आणि गौतम अदानी यांचं लग्न झालं. लग्नानंतर दोघांसाठीही आव्हानात्मक काळ सुरु झाला. उद्योग वाढीच्या निमित्ताने गौतम अदानींना अनेकदा बाहेरगावी जावं लागत असे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचं लग्न त्यांच्या कुटुंबातील वडिलांनी ठरवलं होतं. प्रीतीबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यानंतर त्या अहमदाबादला आल्या. काही काळ त्या आपल्या कुटुंबासह अमेरिकेतही राहिल्या आहेत.

प्रीती अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी अहमदाबादच्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेतले. मात्र लग्नानंतर त्यांना करिअर सोडावे लागले. १९९६ मध्ये लग्नानंतर त्या गौतम अदानी यांच्या NGO अदानी फाऊंडेशनच्या अध्यक्षा झाल्या. दंतचिकित्सक बनून काही लोकांची सेवा करू शकेन, पण फाऊंडेशनमध्ये सहभागी होऊन लाखो लोकांची सेवा करू शकेन, हे लक्षात आल्यावर त्यांनी आपलं करिअर सोडलं.

गुजरातमध्ये शिक्षण क्षेत्रात अदानी फाऊंडेशनचे मोलाचे योगदान आहे. सीएसार निधीतून या फाऊंडेशनचे कार्य चालते. गुजरातमध्ये साक्षरता वाढीसाठी या उद्योग समूहाने मोठे कार्य उभारले आहे. २०१८-१९ मध्ये या फाऊंडेशनने १२८ कोटी रुपये खर्च केले आहे.

सर्व सूख लोळण घेत असतानाही प्रिती अदानी यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते या फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य करीत आहेत. देशातील १८ राज्यांतील २३०० गावांमध्ये अदानी फाऊंडेशनचे काम सुरु आहे. प्रिती अदानी या गरिबी, निरक्षरता, कुपोषण याविरोधात काम करीत आहेत. उत्थान, स्वच्छाग्रह, सक्षम आणि सुपोषण या कार्यक्रमामार्फत अदानी यांचे सेवा कार्य जोरात सुरु आहे. अदानी समूह या कार्यक्रमासाठी भरभरून निधी देत आहे.

अदानी फाऊंडेशनची स्थापना झाली तेव्हा केवळ दोन कर्मचारी होते. पण आज फाऊंडेशनने दावा केला आहे की ते भारतभरात दरवर्षी ३२ लाख लोकांना मदत करते. त्याच्या विस्तारात प्रीती अदानी यांचा मोठा हात आहे.

First Published on: February 3, 2023 3:00 PM
Exit mobile version