झीरो बॅलन्स अकाऊंटला चेकबुकची सुविधा

झीरो बॅलन्स अकाऊंटला चेकबुकची सुविधा

RBI

वित्तीय समावेशनाच्यादृष्टीने बँकेत सुरू करण्यात आलेल्या बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट (झीरो बॅलन्स)असलेल्या ग्राहकांना चेकबुक आणि एटीएम कार्ड नि:शुल्क देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने सोमवारी दिले. बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट (बीएसबीडी) संदर्भातील नियमावली “आरबीआय’ने शिथिल केली आहे. खात्यांना किमान शिलकीची अट नसल्याने बँकांकडून त्यावर कोणतीही सुविधा देण्यात येत नव्हती. मात्र, यापुढे बचत खातेदारांप्रमाणे बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट असलेल्या ग्राहकांना चेकबुक आणि इतर सुविधा कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना आणि किमान शिलकीच्या अटीविना उपलब्ध कराव्यात, असे निर्देश “आरबीआय’ने बँकांना दिले आहेत. यामुळे ग्राहकांना चेकबुक, एटीएम कम डेबिट कार्ड निःशुल्क उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय ग्राहकांना बँक खात्यात रोख भरण्याची सुविधा मिळेल. या सुविधा देताना बँकांना किमान शिलकीची अट लागू करू नये, असे “आरबीआय’ने स्पष्ट केले आहे.

First Published on: June 12, 2019 5:10 AM
Exit mobile version