मुंबईत 1 कोटी 16 लाखांचे ड्रग्ज हस्तगत

मुंबईत 1 कोटी 16 लाखांचे ड्रग्ज हस्तगत

मुंबईत आज दोन ठिकाणी ड्रग्ज तस्करीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. वरळी युनिटच्या एन्टी नारकोटिक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी ताडदेव आणि नागपाडा परिसरात दोन ड्रग्ज विक्रेत्या गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. मोहम्मद आरिफ अब्दुल गफार शेख आणि कामरान जावेद शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी १ कोटी १६ लाखांचा एमडीचा साठा हस्तगत करण्यात आला. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे दोघेही ताडदेव आणि नागपाडा परिसरात ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार वरळी युनिटच्या एन्टी नारकोटिक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी संध्याकाळी चार वाजता ताडदेव येथील साने गुरुजी मार्ग, तुळशीवाडी पोस्ट ऑफिस, वसंतदादा पाटील उद्यानासमोर मोहम्मद आसिफला पथकाने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यकडे प्लास्टिकच्या पिशवीत 1 किलो 105 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले आले.

नागपाडा येथील दोनटाकी, सरवर स्क्रॅप दुकानासमोरुन कामरान शेख याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे पोलिसांना 60 ग्रॅम वजनाचे ड्रग्ज सापडले. दोन्ही कारवाईत पोलिसांनी 1 कोटी 10 लाख 50 हजार रुपयांचा 1 किलो 165 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. या दोघांनाही नंतर एनडीपीएस कलमांतर्गत अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कामरान आणि मोहम्मद आरिफ हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. कामरानविरुद्ध मरिनड्राईव्ह, डोंगरी, अंमली पदार्थ विरोधी पथक, वडाळा टी टी, व्ही पी रोड पोलीस ठाण्यात पाच ड्रग्ज तस्करीचे तर डोंगरी पोलीस ठाण्यात चार मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. मोहम्मद आरिफविरुद्ध खंडणीसह मारामारीचे नागपाडा आणि जे जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण यांनी सांगितले.


हेही वाचा – प्रेम पडलं महागात; पिस्तुलाचा धाक दाखवून प्रेयसीला ऑफिसमधूनच उचलले

First Published on: January 20, 2021 6:57 PM
Exit mobile version