एक कोटीच्या विम्यासाठी पत्नीने पतीचा काढला काटा; हत्येसाठी दिली दहा लाखांची सुपारी

एक कोटीच्या विम्यासाठी पत्नीने पतीचा काढला काटा; हत्येसाठी दिली दहा लाखांची सुपारी

पैशाच्या हव्यासाठी पोटी कोण कोणत्या थराला जाईल हे सांगणे कठीण आहे. पैशाच्या लालपोटी जवळच्या व्यक्तीचा जीव घेण्यासही कोण मागे पुढे पाहत नसल्याच्या घटना अनेटका समोर येतात. अशीच एक घटना बीडमधून समोर आली आहे. विम्याचे एक कोटी रुपये मिळवण्यासाठी पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. बीडच्या मसोबा फाट्याजवळ पोलिसांना अज्ञात मृतदेह आढळून आला होता. यावेळी तपासादरम्यान मृतदेहाची ओळख पटली असून हा खून असल्याचे समोर आले. या खुनाच्या तपासात पत्नीनेच पतीच्या नावे असलेल्या एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी त्याची हत्या केल्याचे समोर आले, इतकेच नाही तर पत्नीच्या हत्येसाठी तिने दहा लाखांची सुपारी दिली होती.

काही दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील पिंपर गव्हाण शिवाराजवळील मसोबा फाट्याजवळ पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. यावेळी बीड ग्रामीण पोलिसांकडून या मृतदेहाची ओळख पटवण्याबरोबर त्याच्या मृत्यूचे कारण शोधले जात होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात अपघातामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय होता. मात्र चौकशीत बीड शहरातील मंचक गोविंद पवार या व्यक्तीचा मृतदेह असल्याचे समोर आले.

पोलिसांनी तात्काळ मंचक यांचा मुलगा आणि पत्नीकडे विचारणा केली. यावेळी त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांचा संशय बळावला, मंचक यांचा मृत्यू अपघात असून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. सबळ पुरावे नसतानाही पोलिसांनी मंचक यांच्या मृत्यूमागचे गूढ उलगडण्यास सुरुवात केली. पोलिसांनी गोपनीय सुत्रांच्या माहितीनुसार, याप्रकरणी बीडमधील काकडीचा इथल्या श्रीकृष्ण सखाराम बागलाने याला ताब्यात घेतले.

श्रीकृष्ण बागला यानेही पोलिसांना चौकशीदरम्यान हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी वर्दीचा धाक दाखवताच त्याने सत्या घटना सांगितली. मृत मंचर पवार यांच्या पत्नी गंगाबाई पवार हिने पतीच्या हत्येसाठी माझ्यासह इतर तिघांना दहा लाखांची सुपारी दिली. अशी कबुली आरोपी श्रीकृष्ण याने दिली, यानंतर पोलिसांनी श्रीकृष्ण बागलाने याच्यासह सोमेश्वर वैजनाथ गव्हाणे, गंगाबाई मंचक पवार यांना अटक केली, तर अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मंचक पवार यांच्या नावे एक कोटी रुपयांची विमा पॉलिसी होती. ही पॉलिसी रक्कम मिळवण्यासाठी पती गंगाबाई पवार हिने पती मंचक याच्या हत्येसाठी श्रीकृष्ण बागलाला दहा लाख रुपयाला सुपारी दिली. यावेळी श्रीकृष्ण बागलाने मंचक पवार याला दिवसभर दारू पाजली. त्यानंतर शहरातील एका अज्ञात रस्त्यावर नेत त्यांच्या डोक्यावर वार करत हत्या केली. यानंतर मृत मंचक याला स्कूटरवर बसवून मसोबा फाट्यावर एका टेम्पोने धडक दिली. या धडकेत मंचक पवार यांचा मृत्यू झाल्याचं भासवलं आणि घटनास्थळावरून श्रीकृष्ण बागलाने दोन साथीदारांसह घटनास्थळावरून पोबारा केला.


पुणे हादरले! नोकरीच्या शोधात असलेल्या महिलेवर चालकाचा बलात्कार

First Published on: June 13, 2022 2:00 PM
Exit mobile version