पुणे हादरले! नोकरीच्या शोधात असलेल्या महिलेवर चालकाचा बलात्कार

या जोडप्याने चालकावर विश्वास ठेवून ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पीडितेचा  पती बाथरूमसाठी गाडीबाहेर आला असता नराधम चालकाने गाडी चालू केली आणि पीडितेला घेऊन पसार झाला.

nashik rape case nashik beauty parlor owner lady rape accuse arrested

कामाच्या शोधासाठी पुण्यात आलेल्या एका महिलेवर स्वारगेट आणि कात्रजमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ माजली असून पीडित महिलेने तत्काळ पोलिसांत धाव घेतल्याने आरोपीला पकडण्यात यश आले आहे.  (A woman who came in search of work was raped twice by the driver in the bus)

हेही वाचा घरफोडी करणाऱ्या बहिणींच्या त्रिकुटाला अटक; २३ तोळ्यांचे दागिने हस्तगत

कामाच्या शोधात पीडिता आणि तिची पती वाशिमहून पुण्यात आले होते. ते राहण्यासाठी एका खोलीच्या शोधात होते. मात्र, त्यांना जागा न मिळाल्याने त्यांनी स्वारगेट स्टॅण्डवरच झोपण्याचा विचार केला. मात्र, नराधमाने त्यांना ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगितले. या जोडप्याने चालकावर विश्वास ठेवून ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पीडितेचा  पती बाथरूमसाठी गाडीबाहेर आला असता नराधम चालकाने गाडी चालू केली आणि पीडितेला घेऊन पसार झाला. आरोपीने स्वारगेटजवळील एका फुटबाथच्या बाजूला बस थांबवून तिच्यावर अतिप्रसंग केला. तसेच, पुन्हा कात्रज बस स्थानकाजवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबवून तिच्यावर बलात्कार केला. नराधमाने त्यानंतर तिला बसमधून खाली उतरवून तो पसार झाला.

हेही वाचा प्रेमप्रकरणातून तरुणीची तिक्ष्ण हत्याराने हत्या, गोवंडीतील घटना

हा प्रकार घडल्यानंतर महिलेने आणि तिच्या पतीने चालकाला शोधायचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तिची तक्रार दाखल करत आरोपीला पकडलं.