पोटासाठी काहीही; कोरोनामुळे बंद पडलेल्या कोचिंग सेंटरला बनवलं जुगाराचा अड्डा

पोटासाठी काहीही; कोरोनामुळे बंद पडलेल्या कोचिंग सेंटरला बनवलं जुगाराचा अड्डा

कोरोनामुळे लागू कपरण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. अनेक कंपन्या बंद पडल्या. यामुळे अनेकांनी वेगवेगळे व्यवसाय सुरु केले. कोरोनामध्ये कोचिंग सेंटर देखील बंद पडले. सुरतमध्ये देखील कोचिंग सेंटर बंद पडल्यामुळे संचालकांनी जुगार सुरु केला. संचालक लोकांना कॉल करुन जुगार खेळण्यासाठी बोलवायला लागला आणि जुगाराचा अड्डा सुरु केला. दरम्यान, कतारगाम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वनराज नथुभा यांना माहिती मिळताच सोनाणी ट्यूशन क्लासेसमध्ये जुगार खेळताना ऑपरेटरसह सात जणांना अटक केली.

पोलीस निरीक्षक नथुभा म्हणाले की, संचालक धर्मेश सोनाणी क्लासेसमध्ये जुगार खेळणाऱ्यांकडून एक हजार रुपये घेत असे. पोलिसांनी ट्यूशन क्लासेस शोधला असता आरोपी तिथे जुगार खेळत होते. पोलिसांनी ३२ हजार ९७० रुपये आणि २९ हजार ५०० रुपये किमतीचे मोबाइल व इतर वस्तू हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनलॉकमध्ये अजून शिथिलता आणल्यानंतर पैसे मिळविण्यासाठी कारखाना, कार्यालयात जुगार खेळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एसीपी धर्मेंद्रसिंग चवडा म्हणाले की कोरोनामुळे शाळा आणि ट्यूशन क्लासेस पूर्णपणे बंद आहेत. क्लासेस बंद पडल्याने संचालकाची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे.


हेही वाचा – Video: गाडी घेऊन पळाला चोर; मालकाने नग्नावस्थेत पाठलाग करत पकडलं चोरालं आणि…


 

First Published on: October 25, 2020 4:12 PM
Exit mobile version