धक्कादायक: वाशी खाडी पुलावर धावत्या लोकलमधून तरूणीला ढकलले

वाशी मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धावत्या लोकलमधून एका २५ वर्षीय तरूणीला ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तरूणी गंभीररित्या जखमी झाली आहे. तरूणीला उपचारांसाठी मुंबईच्या जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाशी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या दरम्यान असणाऱ्या वाशी खाडी पुलाजवळ बुधवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एक तरुणी जखमी अवस्थेत तरूणी पोलिसांना मिळाली. या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याच्या उद्देशातून तिला धावत्या ट्रेनमधून ढकलण्यात आले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरूणीला ढकलणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस संशयित आरोपीची कसून चौकशी करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे लोकलमधील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर पडला आहे.

रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणीला ताब्यात घेऊन उपचारासाठी वाशी च्या मनपा रुग्णलायत दाखल केले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला तातडीने मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सायंकाळी जखमी तरुणी शुद्धीवर येताच पोलिसांनी तिची ओळख पटवून तिच्या कुटुंबियांचा शोध घेण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्या तरूणीचे कुटुंबिय टिटवाळा येथे राहतात. ही तरूणी पवई येथे मोलकरीण म्हणून काम करून त्याच ठिकाणी राहते. सोमवारी सकाळी ती टिटवाळा येथे आईवडिलांना भेटून येते असे सांगून बाहेर पडली होती. मात्र टिटवाळ्याला न जाता ती पनवेलला मैत्रिणीकडे गेल्याचे कुटु्ंबियांच्या चौकशीतून समोर आले. तेथून परतत असताना ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले. मात्र ही तरुणी तपासात सहकार्य न करता आपले जबाब सतत बदलत असल्यामुळे तिच्या सोबत नक्की काय झाले हे निश्चित सांगता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जखमी तरुणीच्या जवळचा मित्र आणि त्याचा मावस भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा – बहिणीने भावाकडे मागितली आर्थिक मदत, भावाने दिला विष पिण्याचा सल्ला

First Published on: December 24, 2020 9:37 PM
Exit mobile version