कॉपीराईट कायद्याच्या उल्लघंनप्रकरणी महामूव्हीच्या सीईओला अटक

कॉपीराईट कायद्याच्या उल्लघंनप्रकरणी महामूव्हीच्या सीईओला अटक

कॉपीराईट कायद्याच्या उल्लघंनप्रकरणी महामूव्हीच्या सीईओला अटक

प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या प्रोडेक्शनच्या चित्रपटाची बेकायदेशीर प्रसारण करुन कॉपीराईट कायद्यांचे उल्लघंन केल्याप्रकरणी महामूव्हीच्या सीईओला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. संजय सुखदेव वर्मा असे या आरोपीचे नाव असून तो दिल्लीचा प्रितमपुराचा रहिवाशी आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत मोहम्मद बिलाल मोहम्मद गफार शेख आणि धनश्याम सुरजबली गिरी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनाही लोकल कोर्टाने जामिनावर सोडून दिले आहे. याच गुन्ह्यांत स्वप्नाली साळुंखे, नारायण शर्मा, धनश्याम गिरी याचे काही सहकारी, झोया फिल्मचे मालक परवीन शेख, सोनम म्युझिक कंपनीचे मालक आणि इतर कर्मचारी, व्हीआयपी फिल्मचे मालक आणि इतर कर्मचारी, टेलिव्हिजन कन्झुमर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, डी व्ही मिडीया इंटरटेंनमेंट अ‍ॅण्ड प्रायव्हेट लिमिटेड, दाखी मिडीया वर्क्सचे संचालक आणि इतरही आरोपी दाखविण्यात आले आहे. लवकरच या गुन्ह्यांत संबंधितांना अटक केली जाणार आहे. यातील तक्रारदार बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचा मुलगा पुनित मेहरा यांनी जुहू पोलीस ठाण्यात एका लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती.

या तक्रारीत त्यांनी त्यांच्या कंपनीकडील चित्रपटांचे अधिकार आणि प्रसारण हक्क असताना त्याचे अनधिकृतपणे प्रसारण केले जात आहे. त्यामुळे त्यांनी पुनित मेहरा यांच्या वडिलांच्या चित्रपटांच्या मालकी हक्कांचे उल्लघंन करुन त्यांच्या चित्रपटाचे बेकायदेशीरपणे प्रसारण केल्याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधितांविरुद्ध जुहू पोलिसांनी फसवणुकीसह कॉपीराईट अ‍ॅक्ट कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास हाती येताच मोहम्मद बिलाल आणि धनश्याम गिरी या दोघांना पोलिसांनी अटक केली. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.


हेही वाचा – एक कोटी ६० लाख रुपयांच्या चरससह तिघांना अटक


 

First Published on: January 19, 2021 10:38 PM
Exit mobile version