घरक्राइमएक कोटी ६० लाख रुपयांच्या चरससह तिघांना अटक

एक कोटी ६० लाख रुपयांच्या चरससह तिघांना अटक

Subscribe

दहिसर परिसरातून तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळील ५ किलोचा चरस हस्तगत करण्यात आला आहे.

एक कोटी ६० लाख रुपयांच्या पाच किलो चरससह तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट बाराच्या अधिकार्‍यांनी दहिसर येथून अटक केली. जिकरुल्ला आलम अफरोज शेख, इकलाख अब्बास शेख आणि शमशाद अब्दुल खैर शेख अशी या तिघांची नावे आहेत. यातील जिकरुल्ला हा बिहार तर इतर दोघेही पालघरचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या तिघांकडून पोलिसांनी पाच किलो चरसचा साठा जप्त केला असून त्याची किंमत एक कोटी साठ लाख रुपये इतकी आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने सोमवार २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दहिसर येथे गुन्हे शाखेच्या युनिट बाराची कारवाई

दहिसर परिसरात काहीजण चरसच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट बाराच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे, अतुल आव्हाड, आव्हाड, मोरे, देवळेकर, जाधव, राणे, अहिरे, खोत, बने, बिडये, सावंत, खानविलकर, कारंडे, तावडे यांनी दहिसर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री उशिरा दहिसर पूर्वेला तीन तरुण संशयास्पदरीत्या येताना पोलिीसांना दिसले. या तिघांनाही पोलिसांनी थांबण्याचा इशारा करताच ते तिघेही पळू लागले. यावेळी पाठलाग करुन या तिघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. जिकरुला याच्या बॅगेतून पोलिसांनी तीन तर इतर दोघांच्या पिशवीतून पोलिसांनी प्रत्येकी एक किलो चरसचा साठा जप्त केला. या चरसची किंमत सुमारे १ कोटी ६० लाख रुपये आहे. पोलीस तपासात जिकरुल्ला हा बिहारचा रहिवाशी असून त्याने हा साठा बिहारला मुंबई शहरात विक्रीसाठी आणला होता. याकामी त्याने इकलाख आणि शमशाद यांची मदत घेतली होती. चरस विक्रीतून आलेल्या पैशांतून या दोघांना काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात येणार होती. मात्र, चरसच्या विक्रीपूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बोगस कागदपत्रांच्या आधारे कारची विक्री करुन बँकेची फसवणूक; ७ जणांना अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -