ह्रदयद्रावक! बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबाचा सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न; चिमुकलीचा मृत्यू

ह्रदयद्रावक! बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबाचा सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न; चिमुकलीचा मृत्यू

बिकट आर्थिक परिस्थितीतीला कंटाळून एका कुटुंबाने विष पिऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यात सात वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. मिरा रोडच्या सीजन बॅनक्युटस् या हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान घटनेतील पती शुद्धीवर येताच फरार झाला असून पत्नीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या घटनेचा आता काशीमीरा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

काशीमीरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईच्या एव्हरशाईन राहणारे रायन ब्राको आणि त्याची पत्नी पूनम काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत होते. यातूव त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान 27 मे रोजी दहिसर चेक नाक्याच्या पुढे सिजन्स बॅनक्युटस या हॉटेलमध्ये ते राहण्यासाठी आले होते. दरम्यान हॉटेल कर्मचाऱ्यांना त्यांच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा ही घटना समोर आली. दुर्दैवाने यात त्या सात वर्षीय चिमुरडीची मृत्यू झाला. तर चिमुरडीच्या आईवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरु केला आहे.

पूनमने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून ते आर्थिक संकटाचा सामना करत होते, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी तिघांनी झुरळ आणि उंदीर मारण्याची गोळी आणि लिक्विड प्राशन केले. माञ त्या औषधांचा पूनम आणि ब्राकोवर काही परिणाम झाला नाही. यावेळी ब्राकोने पूनमचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न ही केला. मात्र तिने आरडाओरडा करताच त्याने तिथून पळ काढला. सध्या तो फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. अशी माहिती काशीमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.


HDFC चे 100 ग्राहक झाले मालामाल; अकाऊंटमध्ये अचानक 13 कोटी रुपये झाले जमा

First Published on: May 30, 2022 9:45 PM
Exit mobile version