घरअर्थजगतHDFC चे 100 ग्राहक झाले मालामाल; अकाऊंटमध्ये अचानक 13 कोटी रुपये झाले...

HDFC चे 100 ग्राहक झाले मालामाल; अकाऊंटमध्ये अचानक 13 कोटी रुपये झाले जमा

Subscribe

पोलिसांनी बँकेच्या ब्रांच अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काही तांत्रिक बिघाडामुळे एसएमएस गेल्याचे सांगण्यात आले. ब्रांचमधील एका सॉफ्टवेअर पॅचची प्रक्रिया सुरू असल्याने ही समस्या उद्भवल्याचे त्यांनी सांगितेल.

तामिळनाडूमधील एचडीएफसी (HDFC) बँकेने एका दिवसासाठी 100 हून अधिक ग्राहकांना श्रीमंत केले आहे. रविवारी बँकेने त्यांच्या अकाऊंडमध्ये 13-13 कोटी रुपये जमा केले, मात्र ग्राहकांचा हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण देशातील या बड्या बँकेच्या चुकीमुळे ही घटना घडली होती. हीच चूक आता अनेकांसाठी चर्चेचा विषय बनली आहे.

चेन्नईतील , टी. नगर येथील एचडीएफसी बँकेच्या ब्रँचशी संबंधित 100 ग्राहकांना एक मेसेज आला. मेसेजद्वारे बँकेने प्रत्येक ग्राहकाला सांगितले की, त्यांच्या अकाऊंटमध्ये 13 कोटी रुपये जमा झाले आहेत. म्हणजे एकूण 1300 कोटी रुपयांचे मेसेज बँकेने पाठवले होते. एवढी मोठी रक्कम एकाच वेळी अकाऊंटमध्ये जमा झाल्याचे पाहून ग्राहकाचे डोळेचं फिरले. यावेळी आपले अकाऊंट हॅक झाल्याच्या भीतीने त्या ग्राहकाने पोलिसांना माहिती दिली.

- Advertisement -

पोलिसांनी बँकेच्या ब्रांच अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काही तांत्रिक बिघाडामुळे एसएमएस गेल्याचे सांगण्यात आले. ब्रांचमधील एका सॉफ्टवेअर पॅचची प्रक्रिया सुरू असल्याने ही समस्या उद्भवल्याचे त्यांनी सांगितेल. ही समस्या चेन्नईतील त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या ब्रांचमधील काही अकाऊंटपुरती मर्यादित होती.

एचडीएफसीच्या एका सूत्राने सांगितले की, हे केवळ तांत्रिक बिघाडामुळेच झाले आहे. कोणतेही हॅकिंग झाले नाही आणि 100 ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये 13 कोटी रुपये जमा केले नाहीत. तांत्रिक त्रुटीमुळे फक्त मेसेज पाठवले गेले.

- Advertisement -

बँकेच्या सूत्राने पुढे सांगितले की, “ही माहिती मिळताच आम्ही संबंधित अकाऊंटमधून पैसे काढणे त्वरित थांबवले आहे. या दरम्यान अकाऊंट धारकांना फक्त पैसे जमा करता येतात. त्यामुळे समस्येचे निराकरण होईपर्यंत हे निर्बंध हटविले जाणार नाहीत.

रविवारी 80 टक्के समस्या दूर झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. आयटी रिटर्न भरताना ग्राहकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागेल, असे विचारले असता, हेदेखील निश्चितच सोडवले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले.


Income Tax Rules : आजपासून रोख पैसे काढण्याबरोबरच ठेवींसाठी पॅन, आधारची आवश्यकता

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -