गुन्हेगारीत पाटणा पहिल्या तर दुसऱ्या स्थानी नागपूर; जाणून घ्या, मुंबई कितव्या स्थानी?

गुन्हेगारीत पाटणा पहिल्या तर दुसऱ्या स्थानी नागपूर; जाणून घ्या, मुंबई कितव्या स्थानी?

देशभरासह राज्यात कोरोनाच्या संसर्गादरम्यान अनेकांचा रोजगार गेला. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले. नागपूर शहरात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने नागपूर शहराला क्राईम सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने नुकताच एक अहवाल सादर केला. यानुसार, नागपूरने राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला. या यादीत बिहारची राजधानी पाटणा प्रथम क्रमांकावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार वर्ष २०१९ मध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे हत्येच्या प्रकरणात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पाटण्यात दर एक लाख लोकसंख्येमागे ४.७ हत्या झाल्या आहेत, तर नागपुरात दर एक लाख लोकसंख्येमागे ३.६ हत्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे महानगर असलेल्या दिल्लीत हे प्रमाण ३.१ जयपूरमध्ये ३.०, लखनौमध्ये २.६ इतकं आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, देशातील पहिल्या २० शहरांमध्ये मुंबई आणि पुण्याचाही समावेश आहे. यामध्ये पुणे शहराचा १३ वा तर १७ व्या क्रमांकावर आहे. दरम्यान पुण्यात दर एक लाख लोकसंख्येमागे १.५ हत्यांची प्रकरणं समोर आली आहे. तर महानगरी मुंबईत हे प्रमाण अवघे ०.९ एवढे आहे.


राज्यात थंडीने गाठला एकेरी आकडा; सर्वात कमी तापमान ‘या’ ठिकाणी

First Published on: December 22, 2020 2:51 PM
Exit mobile version