झटपट पैसे कमावण्याच्या नादात महिला उतरली ड्रग्जच्या धंद्यात, पोलिसांनी जप्त केला ५० लाखांचा एमडी

झटपट पैसे कमावण्याच्या नादात महिला उतरली ड्रग्जच्या धंद्यात, पोलिसांनी जप्त केला ५० लाखांचा एमडी

सध्या सर्वांनाच सर्वच गोष्टी झटापट हव्या असतात. मात्र पटापट पैसै कमवण्याच्या नादात काही जण चुकीच्या मार्गाला जातात. त्याचा हा चुकीचा मार्ग त्यांच्याकडून मोठी चूक करुन जातो. मलाड येथे राहणाऱ्या एका महिलेला झटपट पैसे कमावणे चांगलेच महागात पडले आहे. सुमारे 50 लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी एका महिलेस अटक करण्यात आली आहे. आझाद मैदान युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने या महिलेला अटक केली आहे. सायरा खान असे या महिलेचे नाव आहे. या महिलेला लोकल कोर्टाने 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सायराकडून पोलिसांनी अर्धा किलो एमडी ड्रग्ज जप्त केले असून गेल्या दोन वर्षांपासून ती ड्रग्ज तस्करीत सक्रिय असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सायराला हे ड्रग्ज कोणी दिले याचा पोलीस शोध घेत आहेत.

मालाड येथील चिंचोली परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी साध्या वेशात सायरावर पाळत ठेवली. गुरुवारी तिथे सायरा खान ही आली. तिची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांनी लगेच साराला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या अंगझडतीत घेतली असता पोलिसांना अर्धा किलो एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिला अटक केली.

सायरा ही काही वर्षांपूर्वी वडापावचा धंदा करत होती. मात्र काही दिवसांनी तिला या धंद्यामध्ये तोटा मिळू लागला. तिला तिचे झालेले नुकसान भरून काढायचे होते. मात्र त्यासाठी इतक्या पटकन पैसे कसे आणायचे हा प्रश्न सायराला पडला होता. नुकसान भरुन काढण्यासाठी तसेच झटपट पैसे कमविण्यासाठी ड्रग्ज धंद्यांत आली होती. त्यात तिचा फायदा होऊ लागला.  गेल्या दोन वर्षांपासून सायरा ड्रग्ज व्यवसाय करत असल्याचे पोलिसांच्या चौकशीदरम्यान समोर आले आहे.


हेही वाचा – मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी, घातपाताचा प्रयत्न उघड

 

First Published on: February 26, 2021 10:09 PM
Exit mobile version