धक्कादायक: जावेचा गर्भपात करण्यासाठी केला जादूटोणा

धक्कादायक: जावेचा गर्भपात करण्यासाठी केला जादूटोणा

Virar a woman superstition for abortion of her sister in law due to a family dispute Mandvi Police Station case registered

विरार येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने कौटुंबिक वादातून जावेचा गर्भपात घडवण्यासाठी जादूटोणा केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांत या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपी महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Virar a woman superstition for abortion of her sister in law due to a family dispute Mandvi Police Station case registered )

पोलिसांकडून पुढील तपास सुरू 

नालासोपारा येथे राहणाऱ्या एका कुटुंबात वाद सुरू होते. आरोपी महिलेचे आपल्या जावेसोबत वाद सुरू होते. त्याचाच राग मनात ठेऊन या आरोपी महिलेने हे अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आरोपी महिलेला जेव्हा समजलं की जावेला दिवस गेले आहेत. ती गर्भवती आहे, अशावेळी या आरोपी महिलेने तिचा गर्भपात करण्यासाठी जादूटोण्याचा आधार घेतला. त्याच झालं असं की, आरोपी महिलेने वैयक्तिक आकसापोटी 12 ऑगस्टला संध्याकाळी पाचच्या सुमारास परिसरातील अघोरी विद्या व जादूटोणा करणाऱ्या भगताला फोनवरून जाऊचा गर्भपात घडवून आणण्यासाठी जादूटोणा करण्यास सांगत मोबाईलवरून भक्ताच्या बँक खात्यात चार हजार रुपये ऑनलाईनने पाठवले होते.

आरोपी महिलेच्या पतीच्या ही बाब लक्षात येताच पत्नीने वैयक्तिक वादात अघोरी व अनिष्ठ प्रथेचा वापर केल्याप्रकरणी मंगळवारी मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कलमाखाली दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मांडवी पोलीस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

( हेही वाचा: Pune Crime : ‘गदर-2’चा शो अखेरचा ठरला; चित्रपटगृहाबाहेर येताच तरुणाची तलवार, कोयत्याने वार करून हत्या )

अल्पवयीन मुलींचं प्रशिक्षणाच्या नावाखाली शोषण 

वसई रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी नालासोपारा शहरात पोलीस भरती प्रशिक्षण वर्गात येणार्‍या अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याची आणि त्याला रेल्वे पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस साथ देत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली होती. नालासोपारा पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. समाधान गावडे (२८) आणि अनुजा शिंगाडे (२५) अशी त्यांची नावे आहेत. समाधान गावडे नालासोपारा शहरात पोलीस दलात प्रशिक्षण देणारी विजयी भव नावाची पोलीस अकादमी चालवतो. याठिकाणी अल्पवयीन मुले-मुली प्रशिक्षणासाठी येतात. समाधान गावडे प्रशिक्षणासाठी येणार्‍या मुलींशी अश्लिल संभाषण, मोबाईलवर मेसेज, लैंगिक शोषण करत असल्याच्या तक्रारी आहेत. समाधान गावडेच्या या कृत्याला अनुजा शिंगाडे उत्तेजन देऊन तिही यात सामील असल्याचा पीडितांचा आरोप आहे. यातील एका पीडित मुलीने तक्रार केल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून समाधान गावडे आणि अनुजा शिंगाडे या दोघांना अटक केली.

First Published on: August 16, 2023 3:01 PM
Exit mobile version