घर क्राइम Pune Crime : 'गदर-2'चा शो अखेरचा ठरला; चित्रपटगृहाबाहेर येताच तरुणाची तलवार, कोयत्याने...

Pune Crime : ‘गदर-2’चा शो अखेरचा ठरला; चित्रपटगृहाबाहेर येताच तरुणाची तलवार, कोयत्याने वार करून हत्या

Subscribe

Pune Crime : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून (Pune Crime) गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मंगळवारी (15 ऑगस्ट) मध्यरात्री एकच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील मंगला चित्रपटगृहाबाहेर ‘गदर-2’ (gadar 2) चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या एका तरुणाची दहा ते बारा जणांनी तलवार आणि कोयत्याने वार निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नितीन मोहन मस्के (Nitin Mohan Maske) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नितीन म्हस्केचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Sasun Hospital) पाठवला आहे. याबाबत पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. (Pune Crime The show of Gadar 2 was the last As soon as he came out of the theater the young man was stabbed to death with a sword and a coyote)

हेही वाचा – पुण्यात दहशतवाद फोफावतोय? ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या दोघांना अटक

- Advertisement -

नितीन म्हस्के (26) या तरुणाची पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली आहे. नितीन म्हस्के मंगला चित्रपटगृहातून ‘गदर-2’ या चित्रपटाचा शेवटचा शो पाहून बाहेर येताच त्याच्यावर तलवार आणि कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात नितीन मस्के या तुरणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन म्हस्के आणि काही मुलांचा यापूर्वी वाद झाला होता. हा वाद कदाचित टोकाला गेला आणि त्यातूनच बुधवारी मध्यरात्री हत्येचा थरार रंगला असल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज आहे. चित्रपटगृहातून बाहेर येताच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

नितीनच्या हत्येनंतर सतीश आनंदा वानखेडे (34) यांनी पोलिसात तक्रार दिली. यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी सागर कोळानट्टी ऊर्फ यल्ल्या (32), मलिक कोळ्या ऊर्फ तुंड्या (24), इम्रान शेख (32), पंडित कांबळे (27), विवेक नवधर ऊर्फ भोला (24), लॉरेन्स पिल्ले (33), सुशील सूर्यवंशी (30), मनोज हावळे ऊर्फ बाबा  (25), आकाश गायकवाड ऊर्फ चड्डी (24), रोहन ऊर्फ मच्छी मल्लेश तुपधर (20), विवेक भोलेनाथ नवधरे (27), अक्षय ऊर्फ बंटी साबळे (21), विशाल भोले (30) या तरुणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व तरुण ताडीवाला रोड परिसरात राहतात.

- Advertisement -

हेही वाचा – Nitin Gadkari : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; हवेतून चालणार बस

पोलिसांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी नितीन मस्के व त्याच्या साथीदारांनी मिळून आरोपी सागर कोळानट्टी उर्फ यल्ल्या यांच्यावर किरकोळ वादातून मारहाण करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. याप्रकरणी म्हस्के आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांकडून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र या भांडणाचा राग मनात ठेवून सागर कोळानट्टी आणि त्यांच्या साथीदारांनी नितीन म्हस्केचा पाठलाग करण्यास सुरूवात केली आणि तो चित्रपटगृहातून बाहेर येताच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

- Advertisment -