वीरपत्नीची भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी नियुक्ती

वीरपत्नीची भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी नियुक्ती

वीरपत्नीची भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी नियुक्ती

जम्मू-काश्मीरमध्ये २ सप्टेंबर २०१५ रोजी बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांशी लढताना रायफलमन शिशिर मल्ल शहीद झाले होते. शहीद शिशिर मल्ल हे ३२ राष्ट्रीय रायफलमनमध्ये तैनात होते. या शहीद जवानाची पत्नी संगीता मल्ल यांचा लष्करामध्ये प्रवेश झाला आहे. चेन्नईमधील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांची लष्कारात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.

वीरपत्नीची लेफ्टनंट म्हणून सैन्यात रुजू

रायफलमन शिशिर मल्ल दहशतवाद्यांशी लढत देत असताना शहीद झाल्यानंतर त्यांची पत्नी संगीता या मानसिक दृष्ट्या खचल्या होत्या. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रमंडळींच्या पाठिंब्यामुळे आयुष्याची नवी सुरूवात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. नवी सुरूवात करताना संगीता यांनी स्पर्धा परिक्षांची तयारी केली. त्यानंतर त्यांची बँकेतसुद्धा निवड झाली. संगीता यांना रानीखेत येथील सैनिकांच्या कार्यक्रमात जाण्याची संधी मिळाली होती. त्याच कार्यक्रमाच शिशिर यांच्या मित्रानी त्यांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित केले. संगीता या सैन्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांनीसुद्धा सैन्यात भरती होण्याची तयारी दाखवली. शिशिर यांच्या हुतात्मा नंतर ३ वर्षांनी संगीता यांना चैन्नई येथील ओटीएमध्ये प्रवेश मिळाला आणि खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली आहे.

First Published on: March 12, 2019 5:22 PM
Exit mobile version