हरयाणातील १० मंत्र्यांनी घेतली पदाची शपथ

हरयाणातील १० मंत्र्यांनी घेतली पदाची शपथ

haryana

हरयाणामध्ये भाजपा-जननायक पार्टीच्या सरकारकडून आज, गुरुवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळातील १० मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. यामध्ये भाजपाच्या कोट्यातून आठ तर जेजेपीच्या एका आमदाराने आणि अपक्ष असलेल्या प्रत्येकी एक-एक आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये कंवरपाल गुर्जर, मूलचंद शर्मा, रंजीत सिंह, जेपी दलाल, बनवारी लाल यांनी कॅबिनेट मंत्री यांचा समावेश आहे. तर ओम प्रकाश यादव, कमलेश ढांडा, अनुप धानक आणि माजी हॉकी खेळाडू संदीप सिंग यांनीही राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पदाची शपथ घेतली आहे. या दहा मंत्र्यांमध्ये आधीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले अनिल विज यांच्याही नावाचा समावेश आहे.

दरम्यान, हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. त्यामुळे भाजपाने जेजेपीचा पाठिंबा घेत दिवाळीच्या मुहूर्तावर सत्ता स्थापन केली. त्यावेळी सगल दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ भाजपाचे नेते मनोहर लाल खट्टर यांनी घेतली होती. तसेच जेजेपीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

First Published on: November 14, 2019 3:20 PM
Exit mobile version