CoronaVirus: १०४ वर्षांच्या वृद्ध महिलेने कोरोनावर केली मात!

CoronaVirus: १०४ वर्षांच्या वृद्ध महिलेने कोरोनावर केली मात!

CoronaVirus: १०४ वर्षांच्या वृद्ध महिलेने कोरोनावर केली मात!

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. जगभरात २१ लाखाहून अधिक लोक कोरोनाबाधित झाले आहेत. विशेषतः कोरोनामुळे अधिक वृद्धांचा बळी गेल्याचं समोर आलं आहे. मात्र अमेरिकेतील मिनेसोटा येथील १०४ वर्षांच्या वृद्ध महिलेने कोरोना मात केली आहे.

या १०४ वर्षांच्या वृद्ध महिलेचे नाव वेरा मुल्लर आहे. १३ वर्षांपासून मिनेसोटा येथील विनोनातील सॉअर हेल्थ केअर होममध्ये त्या राहत आहेत. त्यांना वाढदिवसाच्या दोन दिवसांनंतर खोकल, ताप येऊ लागला. म्हणून त्यांना २५ मार्च रुग्णालयात दाखल केलं आणि त्यांची कोरोना चाचणी केली. त्यानंतर कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं.

वेराचे कुटुंबिय तिला दररोज भेटायचे. तिच्या आरोग्याची नेहमी काळजी घेत असतं. तिचा मुलगा बॉब मुल्लरने विनोना डेली न्यूजला सांगितलं की, ते नेहमी वेराशी फोनवर बोलत असतं. तिचा वाढदिवस आम्ही साजरी करू शकलो नाही. पण तिच्या मित्रांनी २३ मार्चला वाढदिवस साजरा केला.

जगभरात कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख १४९वर पोहोचली आहेत. जगभरात सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या अमेरिकेत आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ४४ हजार ४२७वर पोहोचली आहे. त्यापैकी २८ हजार ५५९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगातील मृतांचा आकडा १ लाख ३६ हजार ४४ झाला आहे. आतापर्यंत जगभरात ५ लाख २३ हजार ८७३ कोरोनाचे रुग्ण रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – बायको अडकली माहेरी, नवऱ्याने प्रेयसीलाच लग्न करून आणलं घरी!


 

First Published on: April 16, 2020 6:31 PM
Exit mobile version