बिल्किस बानो बलात्कार प्रकरण : जन्मठेपेची शिक्षा भोगणारे 11 आरोपी मुक्त

बिल्किस बानो बलात्कार प्रकरण : जन्मठेपेची शिक्षा भोगणारे 11 आरोपी मुक्त

गुजरातमधील गोध्रा घटनेनंतर 2002 च्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सोमवारी गोध्रा उप कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. गुजरात सरकारने माफी धोरणांतर्गत सर्व दोषींची सुटका करण्यास मान्यता दिली. गोध्रा रेल्वे अग्निकांडच्या घटनेनंतर गुजरातमध्ये जातीय दंगल उसळली होती. मार्च, 2002 मध्ये गर्भवती बिल्किस बानो हिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. (11 convicts serving life imprisonment in bilkis bano rape case released)

या हिंसाचारात बानोच्या घरातील 7 सदस्यांची हत्या करण्यात आली होती. मात्र कुटूंबातील अन्य 6 सदस्य कसातरी जीव वाचवून पळाले होते. त्यावेळी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी कारवाई केली होती. त्यानंतर या 11 जणांवर बिल्किस बानो महिलेवर सामूहिक बलात्कार व तिच्या कुटूंबातील 7 जणांची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारने एक समिती बनवली. त्याचे प्रमुख पंचमहलचे जिल्हाधिकारी सूजल माएत्रा होते. समितीने एकमताने निर्णय घेतला की, सर्व 11 आरोपींना माफी द्यावी. समितीचा निर्णय राज्य सरकारला कळविण्यात आला. त्यानंतर सर्वांना तुरुंगातून मुक्त करण्यात आदेश देण्यात आला, असे त्यांनी सांगितले.

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात महत्वाचे 10 मुद्दे


हेही वाचा – ‘हॅलो’ हा शब्द 18 व्या शतकातला; त्याचा अर्थ आश्चर्य व्यक्त करणे असा, सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांना टोला

First Published on: August 16, 2022 10:47 AM
Exit mobile version