२ अल्पवयीन मुलींवर केला ११ नराधमांनी बलात्कार

२ अल्पवयीन मुलींवर केला ११ नराधमांनी बलात्कार

प्रातिनिधीक फोटो

शेजाऱ्यांसोबत बाहेर गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर ११ नराधमांनी बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. झारखंडमधील लोहारडागा या परीसरात हा प्रकार घडला असून पोलिसांनी या नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सामूहिक बलात्काराच्या या घटनेमुळे या परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाय घटनेविरोधात लोहारडागा परीसरातून संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करण्यात येत आहे.

नेमकं काय झालं?

रविवारी दोन अल्पवयीन मुली शेजाऱ्यांसोबत हिरही हराटोली परीसरात शेजाऱ्यांसोबत बाईकवरुन जात होत्या. पण अचानक हिरही रेल्वे पुलाजवळ त्यांची गाडी बिघडली. त्यातील एका अल्पवयीन मुलीने आपल्या मित्राला फोन करुन मदत करायला सांगितली. त्यामुलाने स्वत: न जाता ११ जणांना त्या ठिकाणी पाठवले. पण ते नराधम मदत करायला आले नाहीत. त्यांनी या मुलींसोबत असलेल्या माणसाला मारहाण करत फोन काढून घेतला. तर या मुलींना निर्जनस्थळी नेऊन त्यांना मारहाण करुन त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. हे सगळे नराधम १८ ते २८ या वयोगटातील असल्याची माहिती पोलीस उपाध्यक्ष आशिष कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

अशा आवळल्या मुसक्या

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरु केला. अल्पवयीन मुलींनी नोंदवलेल्या जबाबावरुन पोलिस अधिक्षक प्रियदर्शनी आलोक यांनी एक टीम तयार केली आणि आरोपी यांच्या घरावर छापा मारत ११ जणांना अटक केली. आरोपींच्या घरात या अल्पवयीन मुलींकडील फोनही जप्त करण्यात आला आहे.

First Published on: August 20, 2018 12:16 PM
Exit mobile version