शोपियांमध्ये टेम्पो दरीत कोसळला; ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू

शोपियांमध्ये टेम्पो दरीत कोसळला; ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू

शोपियांमध्ये टेम्पोला अपघात

जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. बाईकवाल्याला वाचवण्याच्या नादात प्रवाशांनी भरलेला टॅम्पो खोल दरीत कोसळला. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

अशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील मुगल रोडवर ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका बाईकवाल्याला वाचवण्याच्या नादामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले. हा टेम्पो थेट दरीमध्ये जाऊन कोसळला. या अपघातामध्ये ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मागच्या वर्षी १३ जणांचा मृत्यू

शोपियांचे अतिरिक्त उपायुक्त मोहम्मद सलीम मलिक यांनी सांगितले की, या अपघातामध्ये ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर ७ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर एसएमएचएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला होता तर दोन जण जखमी झाले होते. जम्मू-काश्मिरच्या माछिलमध्ये भक्तांनी भरलेली गाडी दूल भागामध्ये दरीमध्ये कोसळून हा अपघात झाला होता.

First Published on: June 27, 2019 7:32 PM
Exit mobile version