अचानक जमा झाले ११ हजार कोटी रुपये, तरुणाने शेअर बाजारात गुंतवताच बँकेने…

अचानक जमा झाले ११ हजार कोटी रुपये, तरुणाने शेअर बाजारात गुंतवताच बँकेने…

अहमदाबाद – तुमच्या बँक खात्यात जर अचानक कोट्यवधी रुपये जमा झाले तर तुम्ही काय कराल? असं अनेकदा अनेकांच्या बाबतीत घडलं आहे. चुकीच्या बँक डिटेल्समुळे वेगळ्याच खात्यात पैसे जातात आणि ज्याच्या खात्यात हे पैसे येतात त्याची काही काळापुरती तरी भांबेरी उडते. असाच प्रकार घडला आहे अहमदाबादेत. एका व्यक्तीच्या डिमॅट खात्यात तब्बल ११ हजार ६७७ कोटी रुपये अचानक जमा झाले.

हेही वाचा – महाविकास आघाडीच्या ‘उद्योगां’ना चाप, एमआयडीसीच्या भूखंडवाटपाला शिंदे सरकारची स्थगिती

बँकेच्या चुकीमुळे रमेश सागर यांच्या डिमॅट खात्यात ११ हजार ६७७ कोटी रुपये जमा झाले. ते गेल्या सहा वर्षांपासून शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करत आहेत. २७ जुलै २०२२ रोजी त्यांच्या डिमॅट खात्यात ११६,७७,२४,४३,२७७ एवढी रक्कम दिसू लागली. त्यांनी लगेच त्यातील २ कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले. त्या गुंतवणुकीवर त्यांना एका दिवसात पाच लाखांचा नफाही मिळाला.

हेही वाचा – 155.5 अब्ज डॉलर्स संपत्तीसह गौतम अदानी बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानींनाही टाकले मागे

मात्र, बँकेला त्यांची चूक लक्षात येताच, बँकेने ती रक्कम परत घेतली. मात्र, तोपर्यंत रमेश सागर यांना पाच लाखांचा नफा झाला होता. यामुळे बँकेने ११ हजार ६७७ कोटी रुपये परत घेतले असले तरीही तरुणाला पाच लाखांचा नफा झाला आहे.

First Published on: September 18, 2022 3:40 PM
Exit mobile version