ऑनलाइन शिक्षणासाठी १२ नवीन चॅनेल – अर्थमंत्री

ऑनलाइन शिक्षणासाठी १२ नवीन चॅनेल – अर्थमंत्री

अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजशी संबंधित पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी घोषणा करीत आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं शआलेय नुकसान होऊ नये म्हणून शिक्षणासाठी सरकारकडून सुविधा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.

अर्थमंत्री म्हणाल्या की, शिक्षण क्षेत्रात ऑनलाइन शिक्षणाचा उपयोग करण्यात आला आहे. याआधी ३ चॅनेल होते आता त्यात आणखी १२ नवीन चॅनेल सुरु केले जाणार आहेत. यासाठी काम सुरु आहे जेणेकरून थेट परस्परसंवादी चॅनेल जोडली जाऊ शकतात. राज्यांना ४ तासांचा कंटेट प्रदान करण्याची विनंती केली गेली आहे जी थेट चॅनेलवर दर्शविली जाऊ शकते.


हेही वाचा – Nirmala Sitharaman Live : आज शेवटची पत्रकार परिषद, वाचा आजच्या ७ घोषणा!


प्रत्येक वर्गासाठी एक चॅनेल

ऑनलाईन शिक्षणाकडे सरकार पूर्ण लक्ष देत आहे. यासंदर्भात सरकार पहिलीपासून ते बारावीसाठी एक एक चॅनेल सुरू करणार आहे. म्हणजेच, प्रत्येक वर्गासाठी एक चॅनेल असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष ई-कंटेट आणला जाणार आहे.

First Published on: May 17, 2020 11:56 AM
Exit mobile version