Coronavirus: अमेरिकेत मृतांचा आकडा वाढला; ९६ हजारहून अधिक जणांचे बळी!

Coronavirus: अमेरिकेत मृतांचा आकडा वाढला; ९६ हजारहून अधिक जणांचे बळी!

जगभरात कोरोना विषाणू फैलाव वाढत आहे. जगातील अनेक देश या कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहेत. जगातील बलाढ्य देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेला आतापर्यंत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत १ हजार २५५ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील मृतांचा आकडा ९६ हजार पार झाला आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत अमेरिकेत १६ लाख २० हजार ९०२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर त्यापैकी ९६ हजार ३५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच आतापर्यंत ३ लाख ८२ हजार १६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

अमेरिकेत सर्वाधिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव न्यूयॉर्क राज्यात झाला आहे. अमेरिकेतील तीन राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. एकट्या न्यूयॉर्क राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ६६ हजार ३५७ असून मृतांचा आकडा २८ हजार ८८५ आहे. न्यूयॉर्क पाठोपाठ न्यू जर्सी आणि इलिनॉय या राज्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव जास्त आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाखो लोक इतर भागात पलायन करत आहे.

अमेरिके पाठोपाठ रशिया आणि ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रशिया आणि ब्राझीलामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाखांहून अधिक आहे. तर मृतांचा रशियात ३ हजार ९९ आणि ब्राझीलमध्ये २० हजार ८२ इतका आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक मृतांचा आकडा ब्रिटन आणि इटलीमध्ये आहे.


हेही वाचा – Coronavirus: …यामुळे १० मिनिटांत तुम्हाला होऊन शकतो कोरोना!


 

First Published on: May 22, 2020 8:30 AM
Exit mobile version