छत्तीसगडमध्ये नक्षलवादी व सुरक्षा दलात चकमक, १३ जवान बेपत्ता

देशभरात करोना व्हायरसचे थैमान सुरू असताना छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित सुकमा जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री नक्षलवादी व सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार चकमक झाली. यात १४ जवान जखमी झाले असून १३ जवान बेपत्ता असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.

सुकमा येथील चिंतागुफा भागात रात्री अडीचच्या सुमारास कोरजगुडा डोंगराळ भागात ही चकमक झाली. या भागात नक्षलवादी येणार असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर या भागात जिल्हा राखीव सुरक्षा दल, विशेष शोध दल, कोब्रा बटालियन यांनी संयुक्तपणे शोध मोहिम सुरू केली. तब्बल १५० जवान या मोहिमेत सहभागी झाले होते. सुरक्षा दल जंगलात आल्याचे कळताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यास जवानांनीही चोख उत्तर दिले. यावेळी उडालेल्या चकमकीत १४ जवान जखमी झाले. नंतर त्यांना एअरलिफ्ट करून रायपूर येथील रुग्णालयात आणण्यात आले. यातील २ जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, चकमकीनंतर १३ जवान बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे

First Published on: March 22, 2020 5:41 PM
Exit mobile version