काय सांगता! तालिबानच्या सुरक्षेमुळे १५० भारतीय परतले मायदेशी

काय सांगता! तालिबानच्या सुरक्षेमुळे १५० भारतीय परतले मायदेशी

काय सांगता, तालिबानच्या सुरक्षेमुळे १५० भारतीय परतले मायदेशी

अफगाणिस्तानवर (Afganistan) तालिबान्यांनी सत्ता मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिक देश सोडून पळून जाण्यासाठी जिवाचा आकांत करत आहेत. तालिबान्याच्या दहशतीखाली केवळ अफगाणी नगारिकचं नाही तर काही भारतीय नागरिक देखील अडकले आहेत.  गेली अनेक दिवस अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचा खरा क्रूर चेहरा संपूर्ण जगासमोर आला आहे. तिथे महिला तसेच सामान्य नागरिक क्रूर अत्याचाराचे बळी होत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची चिंता सतावत होती मात्र आता अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या तब्बल १५० भारतीय नागरिकांना तालिबान्यांनी सुखरुप मायदेशी सोडल्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काबुलमध्ये (Kabul) असलेल्या एका राजदूतांसह १५० भारतीयांना तालिबान्यांनी सशस्र विमानतळावर सुखरुप सोडल्याचे वृत्त एएफपी एजेंसीने दिले आहे. (150 Indians return home due to Taliban security)

अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या दुतावासाबाहेर तालिबान्यांची एक तुकडी AK ४७ आणि रॉकेट लाँचर्ससह एक तुकडी उपस्थित होती. तर दुतावासात १५० लोक होते. गेल्या अनेक दिवसांपासून तालिबान त्यांना जिवे मारेल अशी भिती त्यांना होती मात्र तालिबानाने त्यांना कोणतीही इजा न पोहचवता सुरक्षितरित्या विमानतळावर सोडण्यात आले. तालिबान्यांनी भारतीय नागरिकांना जिथे हिंसाचार नव्हता त्या ठिकाणाहून विमानताळावर आणण्यात आले. दुसरीकडे भारतीय वायुसेनेचे सी १७ विमान भारतीय नागरिकांची विमानतळावर वाट पाहत होते.

भारतीय नागरिकांच्या ग्रुपमध्ये असलेल्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, दुतावासातून दुसऱ्या गटाला बाहेर काढण्यात येत होते तेव्हा रस्त्यात तालिबान्यांची सुरक्षा होती. त्यांनी आम्हाला बाहेर पडण्यासाठी मदत केली. भारतीय वायुसेनेच्या सी १७ विमानातून आम्ही भारतात परतलो.


हेही वाचा – Taliban ने भारतातील आयात-निर्यात थांबवली, जाणून घ्या दोन्ही देशात कोणत्या वस्तूंचा होतो व्यापार

First Published on: August 19, 2021 9:02 PM
Exit mobile version