पाकच्या बलुचिस्तानमध्ये वाहन दरीत कोसळून 18 जणांचा मृत्यू

पाकच्या बलुचिस्तानमध्ये वाहन दरीत कोसळून 18 जणांचा मृत्यू

प्रातिनिधक छायाचित्र

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये वाहन दरीत (passenger van) कोसळल्याने १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पाकिस्तानच्या पर्वतीय बलुचिस्तान प्रांतात (Balochistan province) घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. डॉन या हिंदी भाषिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जोब या राष्ट्रीय महामार्गावरून जाणारं प्रवासी वाहन किल्ला सैफुल्ला (Killa Saifullah)  परिसरातील दरीत कोसळलं.

उपायुक्त हाफिज मुहम्मद कासिम (Hafiz Muhammad Qasim) यांनी सांगितले की, हे वाहन अख्तरझाईजवळील (Akhtarzai ) एका टेकडीच्या माथ्यावरून कोसळले आणि या अपघातात सर्व १८ प्रवासी ठार झाले आहेत. अख्तरझाई हा झोबमधील १.५७२ मीटर उंचीवर वसलेला आदिवासी भाग आहे.

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर अब्दुल कुदुस बिजेन्जो यांनी मृत आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींना पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.


हेही वाचा : दिल्लीत मेट्रो कार पार्किंगला भीषण आग, अग्निशमनचे ११ बंब घटनास्थळी दाखल


 

First Published on: June 8, 2022 2:29 PM
Exit mobile version