दिल्लीत मेट्रो कार पार्किंगला भीषण आग, अग्निशमनचे ११ बंब घटनास्थळी दाखल

गेल्या काही दिवसांमध्ये राजधानी दिल्लीत आगीच्या घटनांत वाढ होत आहे. जामीया नगरमधील इलेक्ट्रीक वाहन पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आज सकाळी एका गाडीला आग लागल्यानंतर इतर गाड्यांनीही पेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. याबाबतची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

या दुर्घटनेत अनेक वाहनं जळून खाक झाली आहेत. ई-कार आणि काही ई-रिक्षाही जळाल्या आहेत. मात्र, यामागील आगीचं नेमकं कारण काय आहे, हे अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र, प्रशासनाने तात्काळ दखल घेत ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. येथील मेट्रो पार्किंगमध्ये १० कार, १ मोटारसायकल, २ स्कुटी, ३० ई-रिक्षा आणि ५० जुन्या ई-रिक्षांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

हेही वाचा : दिल्लीसह ‘या’ राज्यांमध्ये कडक उष्णतेच्या लाटेची शक्यता, नागरिकांना सावधानतेचा इशारा

गृह मंत्रालयाच्या कार्यालयात आग

दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये काल रात्री उशिरा आग लागली. गृह मंत्रालयाच्या टेलिफोन एक्सचेंजमध्ये ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे. १२.१८ च्या सुमारास गृह मंत्रालयाच्या कार्यालयात पहिल्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या पथकाने अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण

दिल्ली अग्निशमन सेवेचे प्रमुख अतुल गर्ग म्हणाले की, आगीत १० कार, १ मोटारसायकल, २ स्कूटी, ३० नवीन ई-रिक्षा, ५० जुन्या ई-रिक्षा मेट्रो पार्किंगमध्ये जळून खाक झाल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, आता आग आटोक्यात आली असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे.


हेही वाचा : RBI Repo Rate Hike : EMI अधिक महाग होणार, रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ