नोटीस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडणाऱ्यांना धक्का; भरावा लागणार एवढा दंड

नोटीस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडणाऱ्यांना धक्का; भरावा लागणार एवढा दंड

नोकरवर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नोटीस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडणाऱ्यांना धक्का बसणार आहे. गुजरात अथॉरिटी ऑफ एडव्हान्स रूलिंगने या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नोटीस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याकडून रिकव्हरी करण्यासाठी १८ टक्के जीएसटी वसूल केला जाणार आहे. कंपनीतील एखादा कर्मचारी कंपनी सोडून जात असेल तर त्याला कमीत कमी एक महिन्याचा नोटीस पीरियड पूर्ण करावा लागतो. यासह एखादा कर्मचारी मोठ्या पदावर असेल तर त्याला ३ किंवा ६ महिन्यांचा नोटीस पीरियड पूर्ण करावा लागतो. मात्र, आता नोटीस पीरियड पूर्ण न करता कर्मचारी नोकरी सोडून गेला तर त्याला १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.

अहमदाबादमधील एका प्रकरणावर निर्णय देताना गुजराज अथॉरिटी ऑफ एडव्हान्स रुलिंगने हा निर्णय दिला आहे. अहमदाबादमधील एका एक्सपोर्ट कंपनीतील कर्मचाऱ्याला कंपनी सोडायची आहे. शिवाय, त्याला तीन महिन्यांचा नोटीस पीरियड देखील पूर्ण करायचा नाही आहे. त्यामुळे त्याने एडव्हान्स रुलिंगकडे न्याय मागण्यासाठी गेला. यावर निर्णय देताना एडव्हान्स रुलिंगने नोटीस पीरियड पूर्ण करायचा नसेल तर तुम्हाला १८ टक्के जीएसटी भरावा लागेल अशी सूचना दिली.

एडव्हान्स रुलिंगने आदेशात म्हटलं आहे की, “एंट्री ऑफ सर्व्हीसेसनुसार अर्जदाराला १८ टक्के जीएसटी भरावा लागेल. हे नोटीस कालावधी दरम्यान वेतन वसुलीसाठी लागू होईल. नोटीसची मुदत न संपवता कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचार्‍याकडून शुल्क आकारले जाते. कंपनी आणि कर्मचारी यांच्यातील करारानुसार नियुक्ती पत्रामध्ये नोटीस कालावधीचा उल्लेख केला आहे,”

 

First Published on: January 14, 2021 12:10 PM
Exit mobile version