आसाममध्ये १८ जंगली हत्तींचा मृत्यू, दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह; काय आहे यामागचे नेमके कारण?

आसाममध्ये १८ जंगली हत्तींचा मृत्यू, दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह; काय आहे यामागचे नेमके कारण?

आसामच्या नौगावमध्ये एका डोंगरावर गुरुवारी १८ हत्तींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे वन विभागाने येथे तपास सुरू केला आणि असे समजले की, वीज कोसळल्यामुळे जंगली हत्तीचा मृत्यू झाला आहे आसामचे मुख्य वन संरक्षक अमित सहाय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी कठियाटोली रेंजच्या कुंडोली वनक्षेत्रात डोंगराळ भागात घडली. १८ हत्तींचे मृतदेह हे वेगवेगळ्या जागी सापडले.

मुख्य वन संरक्षक अमित सहाय म्हणाले की, एका जागेवर चार आणि दुसऱ्या जागेवर १४ अन्य हत्तीचे मृतदेह सापडले. हत्तींचा मृत्यू वीज कोसळून झाल्याचे सुरुवातीचा तपासात समजले. वनविभागाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि पशुवैद्यकीयांना घटनास्थळी नेण्यात आले आहे.

नौगाव जिल्ह्याचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि डीएफओ (जिल्हा वन अधिकारी) यांना या भागात पाठविण्यात आले आहे. १८ हत्तींच्या मृत्यू कारण शोधण्यासाठी त्यांना चौकशी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे, असे अमित सहाय यांनी सांगितले.

कठियाटोली वनक्षेत्रात वीज कोसळल्याने १८ हत्तींच्या मृत्यूबद्दल आसामाचे वनमंत्री परिमल शुक्लाबैद्य यांनी शोक व्यक्त केला आहे. शुक्लाबैद्य म्हणाले की, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या सूचनेनुसार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी पीसीसीएफ (वन्यजीव) आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देणार आहेत.


हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेत कोरोना लस घेतलेल्या लोकांना विनामास्क फिरण्यास परवानगी


 

First Published on: May 14, 2021 3:34 PM
Exit mobile version