घरताज्या घडामोडीCoronavirus: अमेरिकेत कोरोना लस घेतलेल्या लोकांना विनामास्क फिरण्यास परवानगी

Coronavirus: अमेरिकेत कोरोना लस घेतलेल्या लोकांना विनामास्क फिरण्यास परवानगी

Subscribe

जगभरात अजूनही कोरोनाचं संकट घोंघावत आहे. जगात आतापर्यंत १६ कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली असून ३३ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ कोटींहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असल्यामुळे लॉकडाऊन आहे. जगात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेला देश म्हणजे अमेरिका. पण सध्या अमेरिका कोरोनावर मात करताना दिसत आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC)ने कोरोना लस घेतलेल्या लोकांना विनामास्क फिरण्यास परवानगी दिली आहे.

सीडीसीने सांगितले की, ‘अमेरिकेत लसीकरण झालेल्या लोकांना विना मास्क आणि ६ फूट अंतरावर राहून आपले काम करू शकतात. पण ज्या ठिकाणी लसीकरण सुरू आहे किंवा सरकारने अजूनही निर्बंध घातले आहेत, अशा ठिकाणी हा नियम लागू होणार नाही.’

- Advertisement -

याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सीडीसीचे कौतुक केले आहे. बायडेन म्हणाले की, ‘काही वेळापूर्वी मला समजले की, सीडीने लसीकरण झालेल्या लोकांना मास्क न वापरण्यास परवानगी दिली आहे. हा एक मोठा निर्णय आणि चांगला दिवस आहे. हे शक्य झाले कारण आम्ही खूप कमी वेळात देशातील बहुतेक लोकांना लस दिली.’

बायडेन पुढे म्हणाले की, ‘आमच्या लसीकरण कार्यक्रमाने मागील १४४ दिवसांपासून जगाचे नेतृत्व केले आणि हे बऱ्याच लोकांच्या मेहनतीमुळे यशस्वी झाले. वैज्ञानिक, संशोधक, औषध कंपन्या, नॅशनल गार्डस, युएस मिलिटरी, फेमा, सर्व राज्यपाल, डॉक्टर, नर्सेस यांनी कठोर परिश्रम केले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – गुडन्यूज! लॉकडाऊनमध्येही Amazon देणार ७५,००० लोकांना रोजगार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -