Elon Musk News: 19 वर्षीय तरुणाची जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीवर करडी नजर; नेमकं प्रकरण काय?

Elon Musk News: 19 वर्षीय तरुणाची जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीवर करडी नजर; नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेतील एका 19 वर्षी तरुणाने चक्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्या नाकी नऊ आणले आहेत. टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे सीईओ असलेले एलन मस्क यांच्या प्रत्येक हालचालींवर हा तरुण करडी नजर ठेऊन आहे. एका ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून तो मस्क यांच्या प्रायव्हेट फ्लाइट्स नजर ठेऊन असतो. त्यांच्या प्रत्येक हालचालींची अपडेट तो या ट्विटर अकाऊंटवरून देतो. या अकाऊंटचे जवळपास 150,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दरम्यान मस्क यांनी हे ट्विटर अकाऊंट हटवण्यासाठी त्या तरुणाला 5000 डॉलरची ऑफर केली होती मात्र ही ऑफर त्या तरुणाने नाकराली.

जॅक स्वीनी असे या फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने ElonJet नावाने एक ट्विटर अकाउंट तयार केले आहे. तसेच, मस्क यांच्या फ्लाइड्सवर नजर ठेवण्यासाठी त्यांनी एक बॉट (bot) डेव्हलप केला आहे. या अकाऊंटवरून मस्क यांच्या  प्रायव्हेट फ्लाइट्सच्या प्रत्येक हालचालींची माहिती दिली जाते. जसे की, मस्क यांचे प्रायव्हेट फ्लाइट्स कुठून टेक ऑफ झाले, कुठे उतरले आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी किती वेळ लागणार आहे, इत्यादी.

जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यावरही तरुणाची नजर

स्वीनीने आणखी डझनभर बॉट्स विकसित केले आहेत ज्याद्वारे मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स आणि अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस सारख्या हाय प्रोफाइल लोकांच्या हालचालींचा नजर ठेवली जात आहे. गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी मस्कने स्वीनीला सुरक्षेच्या कारणास्तव हे अकाऊंट हटवण्यास सांगितले होते. यासाठी मस्क यांनी त्या तरुणाला 5,000 डॉलरची ऑफरही देऊ केली. जेणेकरून हा तरुण त्यांच्या विमानाचा मागोवा घेऊ शकणार नाही. पण स्वीनीने ऑफर नाकारत 50,000 डॉलरची ऑफर मागितली. यावर तो तरुण म्हणाला की, हे पैसे तो कॉलेज आणि टेस्लाच्या मॉडेल 3 (मॉडेल 3) साठी वापरू शकतो. पण मस्क यांनी ही कल्पना मुळीचं आवडली नाही.

तरुणाची नेमकी मागणी काय आहे?

19 जानेवारी रोजी मस्क आणि स्वीनी यांचे ट्विटरवर शेवटचे बोलणे झाले. मस्क म्हणाले की, ट्विटर अकाऊंट हटवण्यासाठी पैशांची मागणी करणे चांगली गोष्ट नाही. यावर स्वीनी म्हणाला की, इंटर्नशिपसारख्या इतर पर्यायांसह हे करणे सोपे होईल. मात्र मस्क यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र यावर स्वीनी म्हणतो की, तो स्पेसएक्सचा (SpaceX) चाहता आहे. त्याचे वडील या विमान कंपनीत काम करायचे आणि त्यामुळेच त्याला एविएशनमध्ये रस निर्माण झाला.


 

First Published on: January 31, 2022 10:36 AM
Exit mobile version