चिंताजनक! जगातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!

चिंताजनक! जगातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!

Corona Update: चिंतेत वाढ; देशात कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला ३१ हजारांचा टप्पा!

जगभरात कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत जगात २.७८ लाख नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत हा सर्वात मोठा आकडा आहे. तसेच जगात २४ तासांत ७ हजार १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ५३ लाखांहून अधिक झाला आहे. यापैकी आतापर्यंत ६ लाख २९ हजारांहून अधिक जणांचे बळी गेले आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. आतापर्यंत ९३ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर अजूनही जगात ५३ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जगातील कोरोनाबाधितांचा यादीत अमेरिका अजूनही अव्वल स्थानावर आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत ७१ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार २०९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा ४१ लाखांवर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ४६ हजारांहून जणांचा मृत्यू झाला असून १९ लाख ४२ हजारांहून अधिक रुग्ण रिकव्हर झाले आहेत. तर ब्राझीलमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांचा आकडा २२ लाख पार झाला असून कोरोना बळींच्या आकड्याने ८२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

या १० देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या

अमेरिका : कोरोनाबाधित – ४,१००,८७५ – मृत्यू – १४६,१८३
ब्राझील : कोरोनाबाधित – २,२३१,८७१ – मृत्यू – ८२,८९०
भारत : कोरोनाबाधित – १,२३९,६८४ – मृत्यू – २९,८९०
रशिया : कोरोनाबाधित – ७८९,१९० – मृत्यू – १२,७४५
साउथ आफ्रिका : कोरोनाबाधित – ३९४,९४८ – मृत्यू – ५,९४०
पेरू : कोरोनाबाधित – ३६६,५५० – मृत्यू – १७,४५५
मॅक्सिको : कोरोनाबाधित – ३६२,२७४ – मृत्यू – ४१,१९०
चिली : कोरोनाबाधित – ३३६,४०२ – मृत्यू – ८,७२२
स्पेन : कोरोनाबाधित – ३१४,६३१ – मृत्यू – २८,४२६
ब्रिटन : कोरोनाबाधित – २९६,३७७ – मृत्यू – ४५,५०१


हेही वाचा – जगावर युद्धाचे ढग ७२ तासांत दूतावास बंद करा!


 

First Published on: July 23, 2020 8:36 AM
Exit mobile version