‘ऑपरेशन ऑल आऊट’ जोरात, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

‘ऑपरेशन ऑल आऊट’ जोरात, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

प्रातिनिधिक फोटो

रमजान महिन्यात लागू केलेली शस्त्रसंधी उठवल्यानंतर लष्कराने जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातल्या कारवाईला जोरात सुरूवात केली आहे. ऑपरेशन ऑल आऊटच्या माध्यमातून आत्तापर्यंत चार दहशतवाद्यांचा खात्म करण्यात आला आहे. सकाळपासून अनंतनागमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन जारी केले आहे. परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर लष्कराने कारवाई सुरूवात केली. त्यानंतर चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. तर, एका दहशतवाद्याचा शोध सुरू आहे. दरम्यान चकमकीमध्ये एक पोलीस कर्मचारी शहीद झाला असून काही नागरिक जखमी झाले आहेत. अद्यापही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरूच आहे. मंगळवारी देखील पुलवामामध्ये जैश- ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले होते.

ISISचा सहभाग?

दहशतावादी कारवायांमध्ये ISISचा सहभाग असू शकतो असे ट्विट जम्मू- काश्मीरचे पोलीस प्रमुख एस. पी. वेद यांनी केले आहे. पहाटे ५.३० वाजता दहशतवादी कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

वाढत्या दहशतवादी कारवाया

रमजान महिन्यामध्ये जम्मू – काश्मीरमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. याचा फायदा घेत दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली होती, शिवाय पाकिस्तानकडून देखील शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात आले होते. यावेळी काही जवान शहीद झाले होते. शिवाय, नागरी वस्तीला देखील पाकड्यांनी लक्ष्य केले होते. अखेर रमजान महिना संपताच शस्त्रसंधी उठल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरूवात केली आहे.

जवान औरंगजेबची हत्या

२६ वर्षीय भारतीय जवान औरंगजेब यांची रमजानसाठी घरी जात असताना दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. रमजानपूर्वीच औरंरजेब यांची हत्या झाल्याने राज्यात संताप व्यक्त करण्यात आला. शिवाय शस्त्रसंधीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पत्रकार सुजात बुखारी यांची देखील गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यामुळे दहशतवाद्यांना ‘जशास तसे उत्तर द्या’ अशी मागणी काश्मीर व्हॅलीतून पुढे आली होती. अखेर रमजान नंतर शस्त्रसंधी उठताच दहशतवाद्याविरोधातल्या कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.

First Published on: June 22, 2018 1:37 PM
Exit mobile version