आमिर – सनी देओलचे चित्रपट तीनवेळा आमने सामने

आमिर – सनी देओलचे चित्रपट तीनवेळा आमने सामने

बरोबर २० वर्षांपूर्वी अभिनेता आमिर खानचा लगान आणि सनी देओलचा गदर हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. पण आमिर खान आणि सनी देओल यांचे चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होण्याची ही पहिली वेळ नव्हती. हा योगायोग याआधीही दोन वेळा घडल्याचा समोर आले होते. महत्वाचे म्हणजे एकुण तीन चित्रपटाच्या निमित्ताने एकाचवेळी आमिर खान आणि सनी देओल यांचे चित्रपट प्रदर्शित झाले. पण या तिन्ही चित्रपटाच्या निमित्ताने एक गोष्ट जुळून आली ती म्हणजे या दोन्ही अभिनेत्यांचे चित्रपट एकाचवेळी थिएटर्समध्ये आले, त्याचवेळी दोन्ही चित्रपटांनीही चांगली कामगिरी केली हे विशेष. एकीकडे लगानच्या निमित्ताने प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून असे प्रेम देत अनेक पारितोषिके मिळवून दिली. तर दुसरीकडे गदर चित्रपटालाही डोक्यावर उचलून धरले. पण हा योगायोग केवळ या चित्रपटांपुरता मर्यादित नव्हता.

आमिर खानने नुकत्याच एका व्हर्च्युअल चर्चेदरम्यान दोन्ही चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होण्याच्या बाबीचाही खुलासाही केला आहे. आमिर खानचे मत आहे की, जेव्हा दोन मोठे चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होतात, तेव्हा त्या चित्रपटांमधील स्पर्धा पाहता दोन्ही चित्रपट तेव्हाच चांगली करू शकतात जेव्हा दोन्ही चित्रपटांची निर्मिती ही अतिशय उत्तम पद्धतीने केली जाते. सनी देओल आणि माझ्या बाबतीत ही गोष्ट एका इतिहासासारखीच आहे असे आमिर म्हणतो. लगान आणि गदर दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले, पण दोन्ही चित्रपटांनी चांगली कामगिरी केली. याआधीही दिल चित्रपटाच्या वेळी सनी देओलचा घायल सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यावेळीही दोन्ही चित्रपटांनी चांगली कामगिरी केली होती. तर राजा हिंदुस्थानी चित्रपटाच्या वेळीही सनी देओलचा घातक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळीही दोन्ही चित्रपट हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.

गदर सुनामीसारखा… लोक ट्रक भरभरून आले

लगानच्या निमित्ताने आशुतोष गोवारीकर यांनी मी एका चांगल्या चित्रपटासाठी तयार राहण्यास सांगितले होते. चित्रपटाच्या प्रॉड्युसर सोबत मी एकदा भेटलो होतो, तेव्हा मला चित्रपटाबाबत सांगण्यात आले होते. तब्बल चारवेळा चित्रपटाची कथा एकली, त्यानंतर दुसऱ्या वर्षी चित्रपटाच्या बाबतीत निर्णय घेतला. आम्हाला माहित होते, की हा एक चांगला चित्रपट म्हणून समोर येणार आहे. त्याचवेळी प्रदर्शित होणाऱ्या गदर सोबत स्पर्धेशी आम्ही तयार होतो. पण या चित्रपटाचे अतिशय आक्राळ विक्राळ असे स्वरूप होते. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी ट्रक भरभरून आले. नक्कीच तिप्पटीने हा चित्रपट पाहिला गेला असणार. गदर चित्रपट एखाद्या सुनामीसारखाच होता. त्याचवेळी आम्ही तयार केलेला लगान एक टक्क्यांनीही कुठे कमी पडला असता तर मात्र आम्हाला संधीच मिळाली नसती. पण एक गोष्ट चांगली घडली ती म्हणजे दोन्ही चित्रपटांनी चांगली कामगिरी केली.


 

First Published on: June 15, 2021 8:17 PM
Exit mobile version