Omicron Variant: देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या २००वर; ७७ रुग्ण झाले बरे

Omicron Variant: देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या २००वर; ७७ रुग्ण झाले बरे

Omicron Variant: देशात ओमिक्रॉनबाधितांची संख्या २००वर; ७७ रुग्ण झाले बरे

जगभरात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे देशात सातत्याने ओमिक्रॉनबाधित रुग्ण वाढताना दिसत आहे. देशातील आता ओमिक्रॉनबाधितांची संख्या २००वर पोहोचली आहे. यापैकी ७७ जणांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे. काल, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत देशात १६१ ओमिक्रॉनबाधितांची संख्या झाल्याचे सांगितले होते.

देशात काल, सोमवारी ओमिक्रॉनच्या १८ नव्या रुग्णांची वाढ झाली. यामध्ये दिल्लीतील ६, कर्नाटकातील ५, केरळमधील ४ आणि गुजरातमधील ३ रुग्णांची समावेश आहे. दरम्यान आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या २००वर पोहोचली असून आतापर्यंत देशातील ७७ ओमिक्रॉनबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, दिल्लीत आढळले आहेत. त्याचप्रमाणे देशातील कोरोनाबाधितांच्या यादीत देखील महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.

कोणत्या राज्यात किती ओमिक्रॉनबाधित आढळले?

महाराष्ट्र – ५४ रग्ण – २८ रुग्ण डिस्चार्ज
दिल्ली – ५४ रुग्ण – १२ रुग्ण डिस्चार्ज
तेलंगणा – २० रुग्ण
कर्नाटक – १९ रुग्ण – १५ रुग्ण डिस्चार्ज
राजस्थान – १८ रुग्ण – १८ रुग्ण डिस्चार्ज
केरळ – १५ रुग्ण
गुजरात – १४ रुग्ण
उत्तर प्रदेश – २ रुग्ण – २ रुग्ण डिस्चार्ज
आंध्र प्रदेश – १ रग्ण – १ रुग्ण डिस्चार्ज
चंदीगड – १ रुग्ण
तामिळनाडू – १ रुग्ण
पश्चिम बंगाल – १ रुग्ण – १ रुग्ण डिस्चार्ज


हेही वाचा – Omicron Variant: अमेरिकेत ओमिक्रॉनचा पहिला बळी, आठवड्याभरात ७३ टक्के रुग्णवाढ


 

First Published on: December 21, 2021 12:01 PM
Exit mobile version