घरताज्या घडामोडीOmicron Variant: अमेरिकेत ओमिक्रॉनचा पहिला बळी, आठवड्याभरात ७३ टक्के रुग्णवाढ

Omicron Variant: अमेरिकेत ओमिक्रॉनचा पहिला बळी, आठवड्याभरात ७३ टक्के रुग्णवाढ

Subscribe

अमेरिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पहिल्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी टेक्ससमध्ये या पहिल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. पण अजूनपर्यंत याबाबत यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) अधिकृतपणे माहिती दिली नाही. तरी देखील अमेरिकेत ओमिक्रॉनच्या पहिल्या मृत्यू झालेल्या रुग्णांचे वय ५० ते ६० वर्षांदरम्यान होते. त्याने कोरोना लसीचा कोणताही डोस घेतला नव्हता. दरम्यान गेल्या आठवड्याभरात अमेरिकेत ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. त्यामुळे अमेरिकेत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अमेरिकेत ओमिक्रॉनने कहर करण्यास सुरुवात केली असल्यामुळे सध्या अमेरिकत झपाट्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. माहितीनुसार अमेरिकेत जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवलेल्या एकूण नमुन्यांपैकी आतापर्यंत ७३ टक्के केसेस ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. गेल्या आठवड्यात हा आकडा ३ टक्के एवढा होता.

- Advertisement -

दरम्यान सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन प्रत्येक आठवड्याला आपले एक मॉडेल अपडेट करत आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘आतापर्यंत संपूर्ण अमेरिकेत ओमिक्रॉन पसरला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटच्या केसेस सर्वाधिक होत्या, परंतु आता फक्त २७ टक्के राहिल्या आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमध्ये ९२ टक्के केसेस ओमिक्रॉनच्या आहेत, तर वॉशिग्टनमध्ये ९६ टक्के ओमिक्रॉनच्या केसेस आहेत.’


हेही वाचा – Omicron Variant: लस न घेणाऱ्यांनो सावध! तुम्हाला ओमिक्रॉनचा अधिक धोका

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -