२०० वर्षांपूर्वी भारतामुळे जगात पसरलेला ‘हा’ रोग, ५० लाख लोकांना झालेली लागण!

२०० वर्षांपूर्वी भारतामुळे जगात पसरलेला ‘हा’ रोग, ५० लाख लोकांना झालेली लागण!

चीनच्या वुहानमधील करोना व्हायरसने आता जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पण २०० वर्षापूर्वी भारतातल्या एका रोगानेही अशीच दहशत जगभरात घातली होती. भारतीय उपखंडात उगमस्थान असलेल्या पटकी हा रोग जगभरात रशिया, यूरोप आणि अमेरिका अशा देशात पसरला. या रोगाची लागण गेल्या २०० वर्षात सात वेळा साथीच्या रूपात झालेली आहे. जवळपास ५० लाख लोकांना या रोगाची लागण झाल्याचा अंदाज आहे.

ग्रामीण भागात आजही अनेकांच्या तोंडी पटकी रोगाचा उल्लेख आढळतो. एखाद्याला शिवी देण्यात यावी तसा उल्लेख पटकी रोगाचा होतो. ग्रामीण भागात आजही  ‘ए तुला पटकी आली’ अस सर्रासपणे बोललेल एकायला मिळता. पटकीबाबत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २०१० मध्ये जगभरात ३० लाख ते ५० लाख लोकांना हा रोग झाला. त्यामध्ये साधारणपणे १ लाख ते १ लाख ३० हजार रोग दगावले असा अंदाज आहे. या रोगाला महामारी, जरीमरी, विषूचिका असेही म्हणतात. या रोगाचे उगमस्थान हे भारतीय उपखंडात गंगा नदीच्या खोऱ्यात असल्याच्या नोंदी आहेत. हा रोग प्राचिन काळात म्हणजे १८१७ च्या सुमारास भारतातून रशियात पसरला. तेथून या रोगाची लागण ही यूरोप आणि अमेरिका यासारख्या देशातही झाली.

काय आहे पटकी रोग

मानवी आतड्याला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग. पटकी हा रोग स्वल्पविराम चिन्हाच्या आकाराच्या व्हिब्रिओ कॉलेरी या जीवाणूंमुळे होतो. बाधित व्यक्तीच्या विष्ठेने दूषित झालेल्या पाण्यामुळे या रोगाचा फैलाव होतो. पटीकीच्या जीवाणूमुळे एक ते पाच दिवसात एकाएकी जुलाब आणि उलट्या होणे हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. वेळीच उपचार न केल्या पटकीबाधित व्यक्तीच्या शरीरातून १० ते २० लिटर पाणी शरीराबाहेर फेकले जाते. त्यामुळेच डिहायड्रेशनचा मोठा धोका निर्माण होतो. पटकीचे जीवाणून हे पाण्याच्या स्त्रोतातून मुख्यत्वेकरून शरीरात प्रवेश करतात. निरोगी व्यक्ती पटकीबाधित होण्यासाठी १० कोटी जीवाणू त्या व्यक्तीच्या शरीरात शिरकाव झाल्यास या रोगाची लागण होते. उन्हाळाच्या शेवटी तसेच पावसाळाच्या सुरूवातीला या रोगाचा अधिक प्रसार झाल्याच्या नोंदी आहेत. अन्नातून आणि पाण्यातून या रोगांचे जीवाणू शरीरात प्रवेश करतात. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये याचे जीवाणू मिसळणे जाणार नाही याची काळजी घेतल्यास पटकीचा प्रसार रोखता येतो. आजही अनेक यात्रा तसेच जत्रेच्या ठिकाणी जमणाऱ्या मोठ्या प्रमाणातील जनसमुदायाला पटकीची लस ही प्रतिबंधात्मक म्हणून देण्यात येते. पटकीच्या रोगावर प्रथमोपचार म्हणून एरिथ्रोमायसीन, क्लोरॅंफिनिकॉल, टेट्रासायक्लिन आदी प्रतिजैविके रूग्णाला देण्यात येतात.

First Published on: March 31, 2020 12:56 PM
Exit mobile version