रशियाने रात्रभर युक्रेनवर केला बॉम्बहल्ला, २१ नागरिकांचा मृत्यू

रशियाने रात्रभर युक्रेनवर केला बॉम्बहल्ला, २१ नागरिकांचा मृत्यू

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्यापही संपलेले नसून दिवसेंदिवस युद्ध विकोपाला जात आहेत. त्यातच, काल रात्रभर रशियाने युक्रेनमध्ये बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात युक्रेनचे तब्बल २१ लोक मारले गेले. यापैकी ११ नागरिकांचा मृत्यू निकोपोल जिल्ह्यात तर १० जणांचा मृत्यू मार्गान्ट्स येथे झाला.गर्व्हनर वॉलेनटन रेजनीचेंको यांनीही या वृत्ताला दिजोरा दिला आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात आम्हाला कोणाची एकाची बाजू घेण्यास दबाव टाकणे योग्य नसल्याचं दक्षिण अफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं. तसेच, दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांचे सोमवारी आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य खात्याच्या राज्य सचिव नालेदी पँडोर यांनी स्वागत केले. ब्लिंकेन यांची भेट म्हणजे चीन आणि रशियाचा या क्षेत्रातील वाढता हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता.

First Published on: August 10, 2022 5:14 PM
Exit mobile version