Oxygen mock drill: ऑक्सिजन मॉकड्रिलदरम्यान पाच मिनिटांत २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

Oxygen mock drill: ऑक्सिजन मॉकड्रिलदरम्यान पाच मिनिटांत २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

ऑक्सिजन मॉकड्रिलदरम्यान पाच मिनिटांत २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशमधील आगरा येथील भगवान टॉकीज जवळ असलेल्या पारस रुग्णालयात दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. २६ एप्रिलला सकाळी सात वाजता ऑक्सिजन बंद करण्याची मॉकड्रिल केली गेली. यादरम्यान रुग्णालयात ९६ रुग्ण भरती होती. ज्यामधील २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ७४ रुग्ण वाचले आहेत. या घटनेचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान या घटनेचे चार व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये पारस रुग्णालयाचे संचालक डॉ. अरिंजय जैन ऑक्सिजन मॉकड्रिलमध्ये २२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत आहेत. यामध्ये ज्यांच्या नातेवाईकांकडून ऑक्सिजन मागवण्यात आले होते, असे ७४ रुग्ण वाचले आहेत. यासंबंधीत जिल्हाधिकाऱ्यांनी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगून याप्रकरणी न्यायालयीने चौकशी केली जाईल याबाबत सांगितले.

ऑक्सिजन मॉकड्रिल का केले?

पारस रुग्णालयाने २६ एप्रिल रोजी ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्यामुळे पाच मिनिटांसाठी पुरवठा बंद केला होता. गरजेवेळीस गंभीर रुग्ण विना ऑक्सिजन शिवाय राहू शकतात का? याचा अभ्यास करण्यासाठी हे सर्व केले गेले. जेव्हा आगरामध्ये दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू होता तेव्हा ही घटना घडली. ऑक्सिजन आणि बेड्ससाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण फिरायला लागत होते. कोविड रुग्णालयात भरती करण्यासाठी जागाच नव्हती.यादरम्यान पारस रुग्णालयाने ऑक्सिजन मॉकड्रिल केले.

व्हायरल व्हिडिओमध्ये डॉ. अरिंजय जैन यांनी कबूल करत आहेत की, रुग्णांची सुटका करण्यासाठी मॉकड्रिल केले गेले. ज्यामध्ये रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा शून्यावर आला. यादरम्यान पाच मिनिटांत २२ रुग्णांचा मृत्यू झाला.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पारस रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओ शेअर करून या घटनेला जबाबदार कोण असा सवाल मोदी सरकारला विचारला आहे.

आगरा में ऑक्सीजन बंद करके अस्पताल ने मॉकड्रिल की। खबरों के अनुसार 22 मरीजों की मौत।

PM: “मैंने ऑक्सीजन की कमी नहीं होने दी”

CM: “ऑक्सीजन की कोई कमी नहीं। कमी की अफवाह फैलाने वालों की संपत्ति जब्त होगी।”

मंत्री: “मरीजों को जरूरत भर ऑक्सीजन दें। ज्यादा ऑक्सीजन न दें।”

आगरा अस्पताल: “ऑक्सीजन खत्म थी। 22 मरीजों की ऑक्सीजन बंद करके मॉकड्रिल की।”

ज़िम्मेदार कौन?

Posted by Priyanka Gandhi Vadra on Monday, June 7, 2021

 


हेही वाचा – Pm kisan Yojana: खुशखबर! मोदी सरकार शेतकऱ्यांना वर्षाला देतेय ४२ हजार, जाणून घ्या कसे?


 

First Published on: June 8, 2021 12:50 PM
Exit mobile version