जनता कर्फ्यूच्या दिवशी २४०० रेल्वे गाडया रद्द

जनता कर्फ्यूच्या दिवशी २४०० रेल्वे गाडया रद्द

जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या रविवारी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा प्रंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेकडून शनिवार २१ मार्चच्या मध्यरात्री पासून ते २२ मार्च रविवार रात्री १० वाजेपर्यत देशातील सुमारे २४०० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर रविवारी पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यत अंदाजे १३०० इंटरसिटी गाड्यांची सेवा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लोकल सेवा सुरु असणार असून फक्त २० ते २५ टक्के फेर्‍या चालविण्यात येणार आहेत.

२४०० रेल्वे गाडया रद्द

हेही वाचा – Coronavirus: हॉटेल-मेस बंद म्हणून नागरिक चिंतेत; युवक काँग्रेसचा मदतीचा हात


२४०० रेल्वे गाडया रद्द

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी रविवार २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यत जनता कर्फ्यूची घोषणा केलेली होती. ज्यात जनतेने घरी राहूण या जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. याच पार्श्वाभूमीवर देशातील लांबपल्ल्याच्या गाडया रद्द तर उपनगरीय मार्गावरील धावणार्‍या लोकल गाड्यांच्या संख्येत कपात करण्यात येणार आहे. देशामध्ये मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चैन्नई आणि सिकंदराबाद येथे उपनगरीय लोकल चालविण्यात येतील. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने लोकलच्या फेर्‍या कमी धावतात. त्यातच जनता कर्फ्यूमुळे या फेर्‍यांमध्ये आणखी कपात करण्यात यावी, असे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतुक करण्यासाठी जेवढ्या लोकलची आवश्यकता आहे, तेवढ्याच लोकलच्या फेर्‍या चालविण्यात याव्यात, असे स्पष्ट निर्देश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवर रविवारी जास्तीत जास्त २० ते २५ टक्के फेर्‍याच चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

 

First Published on: March 20, 2020 8:43 PM
Exit mobile version