Coronavirus- भारतातील ‘या’ २५ जिल्ह्यात कोरोनाचे वेगाने प्रसार, देशाची डोकेदुखी वाढणार!

Coronavirus- भारतातील ‘या’ २५ जिल्ह्यात कोरोनाचे वेगाने प्रसार, देशाची डोकेदुखी वाढणार!

कोरोना विषाणू

१८ मेपासून देशात लॉकडाउन ४ ची  सुरूवात झाली. लॉकडाऊन ४ मध्ये देशभरात ल़कडाऊनमध्ये शिथीलता आणण्यात आली आहे. परंतु एका आठवड्यात देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली दिसत आहे. केंद्र सरकारने दिलेल्या अहवालानुसार देशातील २५ शहरांमध्ये कोरोनाचा  फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगमा, तमिळनाडू या राज्यात गेल्या आठवडाभऱात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.

२२ मे ला भारतातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या टक्केवारीक कमालीने फरक दिसला. भारतात कोरोना रूग्णांची टककेवारी ६.६ वर पोहचली आहे. या आधी हीच टक्केवारी २.२ ते ३.३ इतकी होती. तर या २५ जिल्ह्यांमध्ये १६ मे पर्यंत हीच टक्केवारी ८ ते ४१ होती ती २२ मेला ११ ते ५२ टक्क्यांवर पोहचली आहे.

देशातील या २५ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, मुंबईसबअर्बन, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबईसाठी एकच समाधानाची गोष्ट म्हणजे १६ मे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारी ४१ होती ती आता २२ मे ला ३१ टक्के झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या कोरोना पॉझिटिव्ह दर ४२ टक्के झाला आहे. तर नाशिकमध्ये ५ टक्के आणि रायगडमध्ये १३ टक्के झाला आहे.

दिल्लीमध्ये दहा जिल्हे, गुजरातमध्ये अहमदाबाद आणि वडोदरा, तमिळनाजुमध्ये चेन्नई, तेलंगणामध्ये हैदराबाद, पश्चिम बंगालमध्ये हावडा, तर मध्यप्रदेशमध्ये इंदौर, उज्जैन, मंदसौर,बुरहानपुर या जिल्हात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत.


हे ही वाचा – चाकरमान्यांची सरकारकडून लूट, ई पाससाठी मोजावे लागतायत ५ हजार – नितेश राणे


 

First Published on: May 25, 2020 11:49 AM
Exit mobile version