२६/११ हल्ला प्रकरण: दोन पाक अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी

२६/११ हल्ला प्रकरण: दोन पाक अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी

२६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यालायने पाकिस्तानच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. अब्दुल पाशा, मेजर इक्बाल असं या अधिकाऱ्यांचे नावं आहेत. २६ नोव्हेंबर २००९ साली मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये शेकडो नागरिक जखमी झाले होते. घडाळ्याच्या काट्यांवर धावणारी मुंबई नगरी या दहशतवादी हल्ल्यामध्ये पूर्णपणे हादरली होती. या हल्ल्यात मुंबई पोलिसांनी फार मेहनत करुन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या हल्ल्यातील सगळ्याच दहशतवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले होते. तर, एका दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली होती. या दहशतवाद्याचे नाव कसाब असे होते. या कसाबलाही सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. दरम्यान, या हल्ल्याचा कट रचन्यात पाकिस्तानच्या दोन लष्करी अधिकाऱ्ंयाचा समावेश असल्याचे सत्र न्यायालयात उघड झाले आहे. त्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने अब्दुल पाशा, मेजर इक्बाल या पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.

हेही वाचा – २६/११ मुंबई हल्ला: तपास अधिकारी महालेंनी अखेर कसाबला हरवले!

First Published on: February 3, 2019 2:24 PM
Exit mobile version