भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; फोर्ब्सच्या यादीत 3 भारतीय महिलांचा समावेश

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; फोर्ब्सच्या यादीत 3 भारतीय महिलांचा समावेश

देशाच्या प्रगतीमध्ये पुरुषांप्रमाणेच स्रियांचा देखील सहभाग आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या नोव्हेंबरच्या अंकात 20 आशियाई उद्योजिकांच्या यादीत 3 भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला. याचा देशाला सार्थ अभिमान आहे. नमिता थापर, गझल अलघ आणि सोमा मंडल या 3 उद्योजिकांचा समावेश आहे.

फोर्ब्सने जारी केलेल्या यादीत अशा महिलांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांनी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत कोणत्याही प्रकारची शाश्वती नसताना आपला व्यवसाय वाढविला आणि यश संपादन केले. कोरोनकाळात लॉकडाऊन असल्याने अनेक कंपन्यांचा व्यवसाय बंद झाला. अशातच या तिघींनी मात्र जिद्दीने स्वतःचा व्यवसाय पुढे नेला आणि यश संपादन केले. फोर्ब्सच्या यादीत असलेल्या या 3 भारतीय उद्योजिका यांनी लक्षणीय कामगिरी केली. यापैकी सोमा मंडल या स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (सेल) चेअरपर्सन आहेत, नमिता थापर या एमक्योर फार्माच्या कार्यकारी संचालक आहेत तर गझल अलघ या होनासा कंझुमरच्या सहसंस्थापक तथा मुख्य नवोन्मेष अधिकारी (चीफ इनोवेशन ऑफिसर) आहेत. सोबतच त्या ममाअर्थ या ब्रॅण्डच्या संस्थापक आहेत. या तिघींनी विविध क्षेत्रांत काम करत स्वतःला सिद्ध केलं आणि भारताच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला.

नमिता थापर (namita thapar)

नमिता थापर या एमक्योर फार्मास्यूटिकल्सच्या सीईओ आहेत नमिता यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. पुण्यात त्यांनी पदवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आयसीएआयमधून चार्टर्ड अकाउंटंटची पदवी घेऊन त्या अमेरिकेला गेल्या. व्यवसायाचा अनुभव घेऊन त्या भारतात परतल्या. नमिता यांची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये आहे. त्याचसोबत शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमात नमिता परीक्षक म्हणून दिसल्या.

सोमा मंडल (soma mandal)

सोमा मंडल यांनी जानेवारी 2021 मध्ये सेलचे चेअरपर्सनपद स्वीकारले. या पदावर विराजमान झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. सोमा यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंचे शिक्षण घेतले आहे. नालकोमध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून सोमा यांनी त्यांच्या करियरची सुरुवात केली.

गझल अलघ (gazal alagh)

गझल अलघ यांचा जन्म हरियाणामधील गुरुग्राम येथे झाला. गझल यांनी पंजाब विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 2016 मध्ये त्यांनी पती वरुण अलघ यांच्यासोबत होनासा कंझुमर प्रायवेट लिमिटेडची स्थापना केली. हा एक टॉक्सिन-फ्री ब्रँड असून सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या एफएमसीजी ब्रँड्समध्ये त्याचा समावेश केला जातो. त्याचसोबत ममाअर्थ या ब्रँडची सुद्धा स्थापना केली. गझल अलघ या शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमात परीक्षक म्हणून दिसल्या होत्या.

या क्षेत्रांमध्ये माेठे याेगदान
माहिती तंत्रज्ञान, औषध इत्यादी क्षेत्रातही नवीन तंत्रज्ञानावर काही जणी काम करीत आहेत. तर काही जणी नाविन्यपूर्ण क्षेत्रांच्या विकासात याेगदान देत आहेत. या यादीत ऑस्ट्रेलिया, चीन, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर, तैवान आणि थायलंड या देशांतील महिलांचाही समावेश आहे.


हे ही वाचा – Forbesच्या उत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिजचा समावेश

First Published on: November 9, 2022 9:49 AM
Exit mobile version