Covishield लसीच्या दोन डोस मधील ३ महिन्यांचे अंतर योग्य की अयोग्य? वाचा सविस्तर

Covishield लसीच्या दोन डोस मधील ३ महिन्यांचे अंतर योग्य की अयोग्य? वाचा सविस्तर

Covishield: कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस 8-16 आठवड्यांच्या दरम्यान दिला जाऊ शकतो - NTAGI

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. अशा परिस्थितीत कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोस मधील अंतराबाबत देशात वेगाने चालू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये वाद निर्माण झाला आहे. ब्रिटनमधील कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याविषयी माहिती मिळाल्यानंतर भारतातही ते अंतर कमी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, आता कोरोनाची लस तयार करणार्‍या अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने भारतात कोव्हिशील्डच्या दोन डोस दरम्यान १२ ते १६ आठवड्यांच्या अंतराला पाठिंबा दर्शविला आहे.

अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस क्लिनिकल चाचणीचे मुख्य अन्वेषक एंड्रयू पोलार्ड यांनी भारतातील कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील अंतराचे समर्थन केले आणि असे सांगितले की, लसीकरणानंतर दुसर्‍या आणि तिसर्‍या महिन्यात संरक्षणाची पातळी लक्षणीय वाढते. या संदर्भात दोन्ही देशांमध्ये कोरोना लसीकरणाची तुलना होऊ शकत नाही. ब्रिटन आणि भारतातील लोकांची राहणीमान व परिस्थिती वेगळी आहे. या दोघांच्या लसीकरण धोरणाची तुलना करणे अयोग्य ठरले.

जगभरातील लस मोहिमेचे उद्दीष्ट शक्य तितक्या लोकांना लसीचा किमान एक डोस देणे हे आहे. भारत सरकारचे या धोरणावर काम सुरू आहे आणि त्यांच्या लसीकरण मोहिमेमध्येही ते दिसून येत असल्याचे ऑक्सफोर्ड लस समूहाचे संचालक एंड्रयू पोलार्ड यांनी असे म्हटले आहे. तसेच, प्रोफेसर पोलार्ड अद्याप अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या एक डोस लस आणि बूस्टर लसीवर काम करत नसून कंपनीचा प्रयत्न असा आहे की, सर्वप्रथम प्रत्येकास लसीचा किमान एक डोस दिला जावा, जेणेकरून सर्वांचे प्राण वाचविणे सोपे होईल. ब्रिटनमधील कोव्हिशील्ड लसीच्या डोस दरम्यानचे अंतर कमी करण्याच्या संदर्भात पोलार्ड म्हणाले, ब्रिटनने येथील कोरोना लसीमध्ये सध्या बदल केला गेला, कारण तेथील लोकसंख्येच्या मोठ्या लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


Covid-19 Vaccine चे दोन डोस घेतले तरच ऑफिसात मिळणार एन्ट्री; ओडिशा सरकारचा निर्देश

First Published on: June 19, 2021 7:04 PM
Exit mobile version